
कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेच्या बारामती तालुका उपाध्यक्ष पदी सौरभ राऊत तर कार्याध्यक्ष पदी सौरभ काटे
बारामती - कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेच्या उपाध्यक्ष पदी सौरभ राऊत तर कार्याध्यक्ष पदी सौरभ काटे देशमुख यांची काल निवड करण्यात आली. ही संघटना गेली 3 वर्ष झाले कार्यरत आहे. संघटनेत सध्या ४० हजार पेक्षा जास्त कृषी विध्यार्थी समाविष्ट आहेत. कृषी क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या , विध्यार्थी यांच्या अडचणी समजून त्या सोडवणे हे संघटनेचे मुख्य उद्धिष्ट आहे. गेल्या महिनाभरात जे बोगस बियाणे प्रकरण असेल , कृषी डिप्लोमा विध्यार्थी , तसेच पदवीचे विद्यार्थी यांचे प्रश्न निवेदनाद्वारे राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्याकडून सोडवून घेतले. सौरभ राऊत हे गेली 3 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोशल मीडिया विभागात उत्तमपणे कार्यरत आहेत.
या निवडीबद्दल राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर,राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख , कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे बारामती तालुकाध्यक्ष संभाजीनाना होळकर, कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष जयदीप ननावरे, पुणे जिल्हाध्यक्ष स्वप्नील चांदगुडे पाटील, बारामती तालुकाध्यक्ष ओंकार खलाटे यांनी अभिनंदन केले.