छत्रपती सोसायटीच्या चेअरमनपदी पांडुरंग गायकवाड
Friday, July 24, 2020
Edit
सांगवी- बारामती तालुक्यातील कांबळेश्वर येथील श्री छत्रपती विका. सोसायटीच्या चेअरमनपदी पांडुरंग किसन गायकवाड तर व्हाईस चेअरमनपदी प्रवीण बुवासो खलाटे यांची बिनविरोध निवड झाली.
संस्थापक स्व. संभाजीराव खलाटे यांनी स्थापन केलेल्या सोसायटीचा कारभार पंचायत समितीचे आजी माजी सभापती करण खलाटे यांच्या मार्गदर्शनाखाली चालतो. कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी विवेक वाघमारे यांनी चेअरमन, व्हा. चेअरमन निवडीचे आयोजन केले होते. दोन्ही पदासाठी प्रत्येकी एक अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध पार पडली. यावेळी शैलेश खलाटे, अशोक खलाटे, वैभव घोरपडे, सर्व आजी माजी संचालक, सचिव विनायक भोसले उपस्थित होते.