बारामतीत आज 6 जण कोरोना पॉझिटिव्ह
Friday, July 24, 2020
Edit
काल बारामती मध्ये एकूण 59 स्वॅब नमुने तपासणीसाठी घेतले होते त्यापैकी 54 जणांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यामध्ये बारामती शहरांमधील चार रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत पॉझिटिव्ह आढळून आलेल्या मध्ये खंडोबा नगर मधील रुग्णाच्या संपर्कातील तिची 65 वर्षाची आई तसेच मुक्ती अपार्टमेंट कसब्या मधील रुग्णाच्या संपर्कातील 24 वर्षाची महिला व सूर्य नगरी येथील रुग्णाच्या संपर्कातील 31 वर्षाचा पुरुष व संघवी पार्क बारामती येथील 32 वर्षाचा पुरुष यांचा समावेश आहे
उर्वरित पाच नमुन्यांमध्ये 3 निगेटिव व दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत त्यामध्ये बारामती शहरातील खंडोबा नगर येथील 32 वर्षीय युवक व कणेरी येथील पॉझिटिव रुग्णाच्या संपर्कातील 46 वर्षीय पुरुष व सकाळचे चार असे एकूण आज दिवसभरात सहा रुग्ण बारामती मध्ये आढळून आलेले आहेत.