-->
शेतकरी बंधूंनी सेंद्रिय शेती व निर्यातक्षम शेतमालाचे उत्पादन घेऊन आर्थिक सक्षम बना - सचिन यादव

शेतकरी बंधूंनी सेंद्रिय शेती व निर्यातक्षम शेतमालाचे उत्पादन घेऊन आर्थिक सक्षम बना - सचिन यादव

कोऱ्हाळे बु- आज रासायनिक शेतीचे दुष्परिणाम व तोट्यात येणारी शेती यामुळे शेतकरी दिवसेंदिवस आर्थिक दुष्टचक्रात जात असताना, त्याला स्वत:च्या कुटूंबियांसाठी व भारतवासीयांसाठी सेंद्रीय शेतमाल मिळवून देणे हे एक आव्हान बनले आहे. या आव्हानांना सामोरे जाताना व रेसिड्यू.फ्री शेतमालाचे उत्पादन घेताना शेतकऱ्यांसाठी सर्वात आव्हानात्मक आहे ते म्हणजे पिकांवरील रोग व किडींचे नियंत्रण करणे. आजपर्यंत भारतात भेसळयुक्त सेंद्रिय औषधे मिळणे हे शेतक-यांना जिकिरीचे होते, आणि जोपर्यंत कीड व रोग नियंत्रण होत नाही तोपर्यंत फायदेशीर शेतीचा विचार शेतकरी करू शकत नव्हता.



         


        के.बी.एक्सपोर्ट कंपनीच्या माध्यमातून गेल्या १५ ते २० वर्षापासून करार पद्धतीने शेती करत असताना शेतक-यांनी ही गरज ओळखून ५ वर्षापुर्वी के.बी.एक्सपोर्ट कंपनीचे संचालक मा. श्री. सचिन यादव यांनी संशोधन व विकास विभाग स्थापन करुन बोटेनिकल आधारित अल्कोलाईड बेस सेंद्रिय उत्पादने प्रत्येक किडीसाठी व रोगांसाठी निर्माण केली आहेत. ही सर्व उत्पादने रासायनिक औषधांच्या तोडीस तोड, ४८ तासात तात्काळ सर्व प्रकारच्या किडी व रोगांवर प्रभावीपणे नियंत्रण करणारी आणि कोणतेही केमिकल भेसळ नसणारी, अपैड़ा मान्यताप्राप्त असलेली, पेटंट सुरक्षित तसेच निमवर आधारित उत्पादने सीआयबी रजिस्टर आहेत. १५ ऑगस्ट १९४७ रोजी ज्या प्रमाणे भारत देशाने पारतंत्र्यातून स्वातंत्र्यात पदार्पण केले होते त्याच दिनाचे औचित्य साधून १५ ऑगस्ट २०२० पासून के.बी.बायो.ऑर्गेनिक्स कंपनीने आपली सर्व उत्पादने वितरीत करून रासायनिक औषधांच्या पारतंत्र्यातून शेतक-यांना मुक्ती दिली आहे. गेल्या ५ वर्षापासून या औषधांवर संशोधन केलेले असून कंपनीने शेतक-यांच्या करार शेतीमधे याची फवारणी करून कीड व रोगांचे उत्तम नियंत्रण करून निर्यातक्षम शेतमालाचे उत्पादन घेऊन तो माल युरोपमद्धे निर्यात केला असल्याची माहिती कंपनी प्रतिनिधी यांनी दिली. तसेच थ्रीप्स व डाऊनी मिलड्यू साठी भारतात सर्वोत्कृष्ट औषध असल्याचे शेतकरी बांधवांकडून सांगण्यात येत आहे.


              सर्व शेतक-यांनी नक्कीच प्रायोगिक तत्वावर या औषधांचा वापर करून कंपनीच्या सेंद्रिय शेती मोहिमेत सहभागी होऊन निर्यातक्षम शेतमालाचे उत्पादन घेऊन आर्थिक सक्षम बनावे अशी अपेक्षा कंपनीचे संचालक सचिन यादव यांनी केली.


Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article