थोपटेवाडी, आज आणखी एका व्यक्तीला कोरोनाची लागण, एकूण रुग्णसंख्या 4
Thursday, October 1, 2020
Edit
कोऱ्हाळे बु - बारामती तालुक्यातील थोपटेवाडी (खोमणेवस्ती) येथील आज आणखी एका 29 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी सांगितले.
काल या व्यक्तीने मंगल लॅब येथे चाचणी केली होती त्यात त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. गावात याअगोदर 3 व्यक्तींना कोरोनाची लागण झाली होती पण त्या तिनही जनांचा रिपोर्ट 4 दिवसात निगेटिव्ह आल्याने त्याने घरी सोडण्यात आले.
ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गावाने आता काळजी घेण्याची गरज आहे.