-->
अमानुषतेचा कळस! 10 महिन्यांच्या चिमुकल्याचं अपहरण करून निर्घृण हत्या

अमानुषतेचा कळस! 10 महिन्यांच्या चिमुकल्याचं अपहरण करून निर्घृण हत्या

 10 महिन्यांच्या चिमुकल्याचं अपहरण करून त्याची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काळज गावातील हद्दीत असलेल्या विहिरीत या 10 महिन्यांच्या चिमुकल्याचा मृतदेह सापडल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. फलटण तालुक्यातील काळज गावात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.


मिळालेल्या माहितीनुसार या चिमुकल्याचं दुचाकीवरून जात असलेल्या जोडप्यानं अपहरण केलं होतं. या संदर्भात सातारा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. गुरुवारी सकाळी या चिमुकल्याचा मृतदेह विहिरीजवळ आढळून आल्यानं मात्र मोठी खळबळ उडाली. ओम आदिक भगत असं या चिमुकल्याचं नाव आहे.



भगत कुटुंबियांच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या विहिरीमध्ये या चिमुकल्याचा मृतदेह आढळला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन हा मृतदेह बाहेर काढला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे


शेजाऱ्यांसोबत असलेल्या वादातून हा प्रकार घडला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. भगत दाम्पत्याचं शेजाऱ्यांसोबत आणि कौटुंबिक वाद असल्याची कुजबुज परिसरात सुरू आहे. तर दोन दिवसांपूर्वी या चिमुकल्याचं दुचाकीवरून येणाऱ्या दाम्पत्यानं अपहरण केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता आणि तपासही सुरू होता. मात्र गुरुवारी या चिमुकल्याचा मृतदेह सापडल्यानं अपहरण केलेल्या दाम्पत्यानं त्याची हत्या केली. या हत्येमागचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही. या घटनेमुळे साताऱ्यात मोठी खळबळ उडाली आहे.


Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article