-->
थोपटेवाडीत आणखी एका 33 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण

थोपटेवाडीत आणखी एका 33 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण

कोऱ्हाळे बु - बारामती तालुक्यातील थोपटेवाडी  येथील आज आणखी एका 33 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी सांगितले.


     3 दिवसांपूर्वी लक्षणे जाणवून आल्याने शासकीय रुग्णालयात कोव्हीड 19 ची टेस्ट करण्यात आली होती त्यात कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. गावात याअगोदर 4 व्यक्तींना कोरोनाची लागण झाली होती पण त्यातील 3 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतलेले आहेत. 2 दिवसांपूर्वी एका 29 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. ती व्यक्ती व आज सापडलेली व्यक्ती असे मिळून गावात आता 2 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत.


गावात एकूण आतापर्यंत 5 रुग्ण सापडले असून ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता थोपटेवाडी गावाने आता काळजी घेण्याची गरज आहे.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article