कोऱ्हाळे बुद्रुक, आज 4 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह, मंगळवारी गावातील सर्व नागरिकांची तपासणी
Sunday, October 4, 2020
Edit
कोऱ्हाळे बु - बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बु|| गावातील आज 4 जणांचा रिपोर्ट पॉझीटिव्ह आला आहे यामध्ये 27 वर्षीय पुरुष, 24 वर्षीय पुरुष, 27 वर्षीय महिला, 56 वर्षीय महिला यांना कोरोनाची लागण झाल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी सांगितले.
दि. 6 रोजी माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत गावातील सर्व व्यक्तींची घरोघरी जाऊन तपासणी करण्यात येणार आहे. या दिवशी गावातील सर्व व्यवहार बंद राहणार आहेत (दवाखाने, मेडिकल सोडून) . सर्वेक्षण पथक सकाळी 8 ते सायंकाळी 5 पर्यंत सर्वेक्षण करण्यात येणार असून सर्व नागरिकांनी घरी थांबून प्रशासनास सहकार्य करावे असे ग्रामपंचायतीच्या वतीने सांगण्यात आले. सर्वग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता थोपटेवाडी गावाने आता काळजी घेण्याची गरज आहे.