धनगर साम्राज्य सेनेच्या पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी बापुराव लकडे यांची निवड
बारामती प्रतिनिधी - बापूराव लकडे खंडोबाचीवाडी( ता बारामती) यांनी जिल्हात केलेल्या समाज कामाची दखल घेत तसेच वेळोवेळी झालेल्या धनगर आरक्षण चळवळीत सक्रिय सहभाग व समाजाविषयी असणारी एकनिष्ठता यामुळे लकडे यांची निवड करण्यात आली.
ही निवड धनगर साम्राज्य सेना महाराष्ट्रात राज्य संस्थापक अध्यक्ष सखाराम बोबडे-पडेगावकर तसेच पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख महादेव बुट्टे व पुणे जिल्हाध्यक्ष अमोल बो-हाडे, यांच्या मार्गदर्शनाखाली बापुराव लकडे यांची पुणे जिल्हा उपाध्यक्ष या पदी निवड करण्यात आली
निवडी नंतर बोलताना लकडे म्हणाले की पुढील काळात सदैव समाजासाठी एकनिष्ठ रहाणार असुन समाजाच्या अडचणीसाठी रस्त्यावर उतरून काम करण्याची ही तयारी त्यांनी दर्शवली तसेच धनगर आरक्षण चळवळीत सक्रिय सहभाग राहिल असे ते म्हणाले
या निवडीसाठी सोशल मिडीयाद्वारे परभणी लोकसभेचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर, अमोल बो-हाडे , महादेव बुट्टे, सरपंच अंकुश लकडे , सचिन कोरडे ,अमोल धायगुडे, बापुराव महानवर , तुषार गडदरे, बाळासाहेब महानवर,रोहन लकडे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.