-->
बारामती तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी हेमंत गडकरी, उपाध्यक्षपदी प्रशांत धुमाळ

बारामती तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी हेमंत गडकरी, उपाध्यक्षपदी प्रशांत धुमाळ

मोरगाव - प्रतिनिधी
बारामती तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी हेमंत गडकरी यांची निवड झाली आहे. ही निवड दोन वर्षांकरिता असेल.
    पुणे जिल्हा पत्रकार संघ संचलित बारामती तालुका मराठी पत्रकार संघाच्या कार्यकारिणीची मुदत संपली असल्याने मावळते अध्यक्ष हेमंत गडकरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे आज मोरगाव येथील निसर्ग संगीत कृषी पर्यटन केंद्र बारामती तालुका मराठी पत्रकार संघाची द्वीवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली.
   यामध्ये हेमंत गडकरी यांची पुन्हा एकदा बारामती तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी फेरनिवड झाली. तर कार्याध्यक्षपदी ज्येष्ठ सदस्य अशोक वेदपाठक, उपाध्यक्षपदी प्रशांत धुमाळ, सचिव पदी सचिन पवार, सह सचिव पदी संदीप आढाव, खजिनदारपदी चंद्रकांत साळुंके, सहखजिनदार पदी दिगंबर पडकर, तर कार्यकारणी सदस्य म्हणून तुषार धुमाळ, सुरज देवकाते, विकास कोकरे व संतोष खंडागळे यांची निवड झाली. तर पुणे जिल्हा महिला कार्यकारिणी पदी संगीता भापकर यांची निवड जाहीर करण्यात आली.
     यावेळी संघाच्या सर्व सदस्यांना ओळखपत्र वितरित करण्यात आले. यावी पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर, कोषाध्यक्ष मनोहर तावरे व संघातील सर्व सदस्य उपस्थित होते. 
   निवडीनंतर बोलताना हेमंत गडकरी म्हणाले की येणाऱ्या काळात तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार असून पत्रकार संघाचे संघटन आणखी मजबूत करणार आहे. तसेच पत्रकारांना 50 लाखांचा विमा मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे.
  निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून परिषद प्रतिनिधी एम जी शेलार यांनी तर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून दादाराव आढाव यांनी काम पाहिले.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article