-->
सामाजिक बांधिलकेतून तालुक्यातील पर्जन्यमानाची सविस्तर माहिती देणारे संभाजी होळकर'

सामाजिक बांधिलकेतून तालुक्यातील पर्जन्यमानाची सविस्तर माहिती देणारे संभाजी होळकर'

बारामती(वार्ताहर): राज्यात विविध पक्ष आहेत. या पक्षाचे पदाधिकारी आपआपली जबाबदारी पार पाडीत असतात. ती जबाबदारी म्हणजे पक्षाने दिलेली जबाबदारी, पक्षाचे काम करणे होय. मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार यांचे उच्च विचार, 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण या उद्देशाप्रमाणे बारामती तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष संभाजी उर्फ नाना होळकर हे संपूर्ण तालुक्यात किती मिलीमीटर पाऊस झाला हे न चुकता सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी व विशेषत: पत्रकारांना माहिती देत असतात.



एखाद्याने म्हटले असते, हवामान खाते जाहीर करेल किती पाऊस पडला किती नाही. वृत्तपत्रांना बातमी सुद्धा देतील हा विचार न करता सामाजिक बांधीलकी जपत ते न चुकता तालुक्यात पडलेल्या पावसाची आकडेवारी देण्यात पुढे असतात.


ही माहिती म्हणजे पक्षाचे काम, राजकारण नव्हे बरं का, सामाजिक उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवून सर्वांपर्यंत माहिती कशी पोहचेल हा त्यांचा मनोमन उद्देश असतो. त्यांनी आजपर्यंत म्हणजे दि.12 ऑक्टोबर 2020 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत व दि.1 जुन 2020 ते आजपर्यंत एकुण पडलेल्या पर्जन्यमानाची सविस्तर आकडेवारी जाहीर केली आहे.


बारामती तालुक्यात एकुण पडलेल्या पर्जन्यमानाची सविस्तर आकडेवारी :-
1) बारामती-
35 मि.मि एकूण-735, 2) उंडवडी क.प-12 मि.मि एकूण-452, 3) सुपे-06 मि.मि एकूण-665, 4) लोणी भापकर-13 मि.मि एकूण-731, 5) माळेगांव कॉलनी-26 मि.मि एकूण-657, 6) वडगांव निं-19 मि.मि एकूण-919, 7) पणदरे-20 मि.मि एकूण-694, 8) मोरगांव-06 मि.मि एकूण-641, 9) लाटे-14.20 मि.मि एकूण-711.2, 10) बर्‍हाणपूर-17 मि.मि एकूण-681, 11) सोमेश्वर कारखाना-8.4 मि.मि एकूण-921.1, 12) जळगांव क.प-17 मि.मि एकूण-882, 13) होळ 8 फाटा-10.5 मि.मि एकूण- 755.2, 14) माळेगांव कारखाना-15 मि.मि एकूण-475, 15) मानाजीनगर- 20 मि.मि एकूण-707, 16) चांदगुडेवाडी-02 मि.मि एकूण-910, 17) काटेवाडी-26 मि.मि एकूण-81.5, 18) अंजनगाव-14 मि.मि एकूण-645.5, 19) सोनवडी सुपे-05 मि.मि एकूण-636, 20) जळगांव सुपे-15 मि.मि एकूण-790, 21) के.व्ही.के-22.2 मि.मि एकूण-604.6, 22) सोनगाव-24.1 मि.मि एकूण-785, 23) कटफळ-19 मि.मि एकूण-734, 24) सायंबाचीवाडी-15 मि.मि एकूण–, 25) चौधरवाडी-5 मि.मि एकूण-407.7, 26) नारोळी-02 मि.मि एकूण-544, 27) कार्‍हाटी-5.4 मि.मि एकूण-543.4, 28) गाडीखेल-25 मि.मि एकूण-766.5


Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article