अखेर थोपटेवाडीत (सावंतवस्ती) कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला
Wednesday, September 9, 2020
Edit
कोऱ्हाळे बु|| - बारामती तालुक्यातील थोपटेवाडी येथील 28 वर्षीय युवकाला कोरोनाची लागण झाल्याचे वैद्यकीय अधिकारी मनोज खोमणे यांनी सांगितले.
या युवकाला दोन दिवसांपूर्वी बारामतीतील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सिल्वर जुब्लि येथे कोरोनाची टेस्ट करण्यास सांगितले ती टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.
बारामती तालुक्यातील सर्वच गावांमध्ये कोरोना रुग्ण सापडत आहेत त्यामुळे आता थोपटेवाडी करांनी आता काळजी घेण्याची गरज आहे .