बारामती, बाजार समितीत सोयाबीनला उच्चांकी दर
बारामती : बारामती कृषि उत्पन्न बाजार समिती मध्ये मंगळवार दि. २०/१०/२०२० रोजी सोयाबीनला रू. ४०८१/- प्रति क्विटल असा उच्चांकी दर मिळाला. सोयाबीनची आवक ८०० क्विटल होऊन किमान दर रू. ३७०१/- व सरासरी रू. ४०००/- प्रति क्विटल असा दर निघाला. सोयाबीनची आवक बारामती सह फलटण, दौंड, इंदापुर, पुरंदर, दहिवडी, नातेपुते, अकलुज या भागातुन येत आहे. वडुजकर आणि कंपनी यांचे आडतीवर अक्षय पांडुरंग कुंभार या शेतक-याचे सोयाबीनला उच्चांकी दर मिळाला अशी माहिती सभापती अनिल खलाटे यांनी दिली.
बारामती येथे दर मंगळवार व शुक्रवार अशा दोन दिवस तेलबियाचे लिलाव होत असतात.शेतमालाचे वजन लिलावापुर्वी होत असल्याने लिलाव झालेनंतर शेतक-यांना त्याच दिवशी पट्टी दिली जाते.तसेच अचुक वजनमाप, चोख व्यवहार, विश्वासहर्ता यामुळे बारामती बाजार आवारात मोठ्या प्रमाणात आवक येत आहे.
यावेळी संभाजी किर्वे, निलेश भिंगे, अमोल वाडीकर इत्यादी खरेदीदारांनी सोयाबीन खरेदी केले. चालु वर्षी पाऊसाचे प्रमाण जादा राहिल्याने सर्वच शेतमालाच्या आवकेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे शेतक-यांनी पिक पद्धतीत बदल करून लागवडीचे नियोजन करावे.शेतीत उत्पादित झालेला शेतमाल स्वच्छ, वाळवुन व ग्रेडींग करून विक्रीस आणावा. त्यामुळे चांगला दर मिळेल व शेतक-यांचा आर्थिक फायदा होईल अशी माहिती सचिव अरविंद जगताप सांगितली.