-->
वाघळवाडीचे ग्रामसेवक म्हणतात कोठेही तक्रार करा मी कोणालाही घाबरत नाही माझा खुप मोठा वशिला, हिटलरशाही पद्धतीच्या कारभारामुळे विकासकामांना खीळ

वाघळवाडीचे ग्रामसेवक म्हणतात कोठेही तक्रार करा मी कोणालाही घाबरत नाही माझा खुप मोठा वशिला, हिटलरशाही पद्धतीच्या कारभारामुळे विकासकामांना खीळ

सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील वाघळवाडी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सुभाष चौधर हे हिटलरशाही पध्दतीने काम करत असल्याने व कोणत्याही प्रकारची कामे करत नसल्याने गावच्या विकास कामात अडचणी येत असून विकासकामात खीळ बसत असल्याने त्यांची बदली करण्याची मागणी वाघळवाडीच्या सरपंच व सदस्यांनी केली आहे.
         याबाबत वाघळवाडीच्या सरपंच नंदा सकुंडे यांच्यासह सदस्य तसेच ग्रामस्थांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्यकार्यकारी अधिकारी तसेच बारामतीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे धाव घेतली आहे. ६ जानेवारी २०२० ते १२ ऑगस्ट २०२० या दरम्यान पदाधिकारी आणि अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वाघळवाडी गावचे ग्रामसेवक हे पाणीपुरवठा डिपॉझीट आलेल्या ग्रामस्थांकडून पैसे घेणे च नमुना नं.७ पावती न देणे, कोरोनाबाबत कोणत्याही स्वरूपाची दक्षता न घेणे, फक्त कागदोपत्री काम पुर्ण करणे त्यामुळे गावात ग्रामपंचायत कोरोनाबाबत गांभीर्य घेत नाही अशा प्रकारच्या ग्रामस्थांच्या तक्रारी येत आहेत, ग्रामपंचायतमध्ये आठवड्यातून २/३ वेळा फक्त उपस्थित रहाणे, न आल्यावरती फोन केल्यानंतर मी पंचायत समिती किंवा बाहेर आहे असे सांगणे,  सरपंच किंवा पदाधिकारी यांना न विचारता व परवानगी न घेता कॅशबुक, सर्व चेकबुक, ७ नं.पावती पुस्तक, प्रोसेडिंग बुक, आलेल्या लोकांचे अर्ज परस्पर घरी घेऊन जाणे व मागणी केल्यावर दप्तर घरी ठेवले आहे, असे सांगणे व ते वेळेवर पदाधिकाऱ्यांना न दाखवणे, कॅशबुक व इतर प्रशासकीय काम स्वत: च्या हस्ताक्षरात न लिहीता ते घरातील व्यक्तिकडून अथवा दुसऱ्याकडून लिहून घेणे त्यामुळे वेगवेगळ्या अक्षरात लिखाण केल्यामुळे संशयास्पद वातावरण तयार होत आहे.
             ग्रामसभेत, मासिक मिटींगमध्ये झालेल्या ठरावांची अंमलबजावणी न करणे, गेली २ वर्षापासून घरांच्या नोंदी अद्याप केलेल्या नाहित त्यामुळे ग्रामपंचायतीचा ८ ते १० लाख रू.महसुल बुडाला आहे,
 सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य व ग्रामस्थ यांचेमध्ये गैरसमज पसरवणे, सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे न देणे,  मा.कार्यकारी अधिकारी, कोठेही तक्रार करा मी कोणालाही घाबरत नाही माझा खुप वशिला आहे असे बोलणे, माहिती अधिकारात मागवलेल्या अर्जाचे निवारण न करणे व सरपंच, उपसरपंच यांनी देवू नका असे ग्रामस्थांना व इतरांना उत्तरे देणे, ऑपरेटर संध्या भुजबळ यांनी त्यांना व्यवस्थित काम न करू देणे, त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला. गेल्या ४ महिन्यापासून ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे नवीन ऑपरेटर मिळणे अवघड जात आहे.
              जिल्हा परिषद पुणे यांचे मार्फत समाजकल्याण जनसुविधा व इतर माध्यमातून जवळपास ४५ लाख रूपयांची कामे मंजुर आहेत, पण ग्रामविकास अधिकारी हे व्यवस्थित पाठपुरावा करत नाहीत, त्यामुळे सर्व कामे ठप्प आहेत. १४ व्या  वित्तआयोग निधी जवळपास ८५ लाख ते ९० लाख अखचीत आहे. याबाबत त्यांनी ठरावात लिहून जबाबदारी न स्विकारता सरपंच, उपसरपंच,सदस्य या सर्वांना जबाबदार धरावे असे लिहिले आहे. यामुळे हा निधी खर्च होऊ शकत नाही,  
               तरी वरील तक्रारींचा विचार करावा व ग्रामविकास अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करून आम्हांस नवीन ग्रामविकास अधिकारी देण्याची व्यवस्था करावी. अन्यथा काम बंद आंदोलन केले जाईल असे निवेदनात म्हटले आहे.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article