किंग मेकर...शिवाजीआण्णा भोसले..वाणेवाडीकर
आज सकाळी आण्णांच्या निधनाची वार्ता समजली नी आठवणींचा जणू पडदाच उघडा झाला ... एकेकाळी आमदारकी ला शरद पवाराना निवडुन आणण्याचे कै. यशवंतराव चव्हाण यांचे आवाहन स्विकारून आण्णानी मोटारसायकल वर प्रचार करुन शरद पवार याना निवडुन आणले होते .पुढे पवार साहेबांचे नाव काकडे कुटुंबीयासारख्या बलाढ्य राजकारणी लोकाना टक्कर देवुन विजयी झाल्याने देशपातळीवर गाजले . महाविद्यालयीन जीवनापासून नेतृत्व गुण अंगी बाळगलेल्या पवार साहेबांची राजकीय वाटचाल जेवढी त्यांच्या बुद्धीमत्तेने गाजली,तेवढीच त्यांच्या मित्रपरिवारामुळे गाजली. अशाच अफाट मित्रपरिवारापैकी वाणेवाडीतील शिवाजी आण्णा भोसले ,आनंदराव दादा भोसले व भोसले परिवारातील बहुतांश जुने लोकांशी त्यानी आवर्जुन मैत्री जपली . अगदी "आरे तुरे" च्या पटीतली मैत्री शरद पवार यांचेशी शिवाजी आण्णांची होती . त्या काळात आण्णानी पवार साहेबांचे नेतृत्व मानुन त्याना सर्वतोपरी मदत केली. आण्णानी देखील आपली राजकीय कारकिर्द बहरत आणत दुष्काळात बारामती चे पंचायत समिती सभापतीपद सांभाळुन अनेक महत्वपूर्ण योजना पवार साहेबांच्या साथीने पुर्ण केल्या.पुढे कै .मुगुटराव आप्पा काकडे यानी स्थापन केलेला सोमेश्वर सहकारी साखर कारखाना पवार कुटुंबीयाकडे यावा यासाठी झालेल्या सत्तापालटात कै वसंतकाका जगताप ,व शिवाजीआण्णा भोसले ,आनंदराव दादा भोसले यांचे मोठे योगदान होते शिवाजी आण्णा म्हटले कि राजकीय क्षेत्रात मोठा दबदबा होता. त्यांचे व्यक्तीमत्व जसे भारदस्त तसेच तेवढाच राजकीय दबदबा होता. पुढे पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्षपद शिवाजी आण्णानी भुषविले. सख्या भावामधे होतात तसेच किरकोळ मतभेद देखील त्यांचे पक्षात झाले. जिल्हा बॅंकेमधे अधिकारी वर्गाच्या चुकीमुळे अध्यक्ष शिवाजीआण्णा देखील २०००-२००१ मधे अडचणीत आले. मात्र धीर गंभीर स्वभावाने आण्णा त्यातुन ही निर्दोष बाहेर पडले.पुणे जिल्हा शिक्षण मंडळाद्वारे आजीवन सदस्य असल्याने त्यानी अनेक गरीब गरजुना नोकरीला लावुन आयुष्यभराच्या रोजी रोटीची व्यवस्था केली.न्यु ईंग्लीश स्कुल ही शाळा काढली. जास्तीत जास्त लोकाना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणुन विविध सोसायट्या संस्था त्यानी काढल्या*.
*सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभा खुप गाजायच्या. तत्कालीन विरोधक शहाजीकाका काकडे , सतीशभैय्या काकडे यांच्या प्रश्नाना कै. वसंतकाका जगताप यांचेनंतर नंतर तत्कालीन अध्यक्ष राजवर्धन शिंदे ,पुरुषोत्तमदादा जगताप हे संचालक मंडळासह सामोरे जायचे, मात्र शिवाजीआण्णा शेवटी स्वत: दोन्ही पार्ट्याना वडीलकीच्या नात्याने समजावुन सांगत सर्वसाधारण सभा शांततेत पार पाडण्यासाठी मोलाचे योगदान देत होते . कारखान्याच्या निवडणुकात शिवाजीआण्णाना विशेष महत्व असे कारण शरद पवाराकडे त्यांचे असलेले वजन मोठे होते.आण्णांच्या अवतीभोवती पुणे व सातारा जिल्ह्याचे राजकारण फिरायचे*. *एक मुलगी हवेलीत राजकीय दबदबा असलेले व यशवंत कारखान्याचे अध्यक्ष असलेले अशोक काळभोर यांचे बंधुना दिली, एक मुलगी माजी आमदार अशोक टेकवडे याना दिली, तर माजी खासदार लक्ष्मण पाटील यांच्या मुलाला एक मुलगी दिली आहे. दोन्ही मुले राजकारणाशिवाय शेती सह आबा व प्रविणदादा आपापल्या उद्योगात जास्त रमले .आदरणीय आण्णांची एका सामान्य कार्यकर्त्याप्रती असलेल्या आपुलकीच्या नात्याची १९९४-९५ ची एक आठवण अशी कि ,कै आण्णा यांचे करंजेपुल येथे हॉटेल शिवनेरी आहे* . *तेथे फलटण तालुक्यातील काही तरुणानी रात्री दारु पीऊन मोठा गोंधळ केला.तेथे बालाजी नावाचा मॅनेजर होता त्याने मला स्वत:,कै बाप्पु गायकवाड( सहा फाटा ),सुर्यकांत रिठे व विनोद सावळकर याना निरोप पाठवीला* *आम्ही जवळच १०० मिटर वर असल्याने रात्रीच हॉटेलवर पोहोचुन त्या गोंधळ घालणारा त्याच्याच भाषेत उत्तर दिले. पुढे पोलीस स्टेशन ला त्याचेविरुद्ध तक्रार केली.मॅनेजर बालाजी ने आमच्या मदतीची माहीती आण्णाना दिली.आण्णानी आवर्जुन बोलवले व आम्हाला शाबासकी देत आमचा पाहुणचार केला.व आम्हाला कसलीही मदत लागली तर हक्काने या असे आश्वासन दिले*. *पुढे योगायोगाने पत्रकारीतेच्या क्षेत्रात आल्याने अनेक वर्ष आण्णा शी सबंध आला. कै .शहाजी शिंदे दरवर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त विशेषांक काढायचे व मी दत्ता सावंत ,दत्ता माळशिकारे ,संतोष शेंडकर महेश जगताप आवर्जुन आण्णाकडे वाढदिवसानिमित्त जावुन त्यांचा आशीर्वाद व चहा,नास्टा घेत असे वाणेवाडीतील आमच्या दुकानच्या उद्घाटनाला कै शिवाजीआण्णानी खुप विनोदी शैलीत भाषण केले.
कै आण्णा बाबत माझ्या सारख्या शेकडो ,हजारो कार्यकर्त्यांच्या भावना आहेत. कै आण्णांच्या पत्नी मागील १२ दिवसापूर्वीच निधन पावल्या खरे तर वाणेवाडीत तेव्हाच शरद पवार साहेब त्याना भेटायला येत आहेत, असा निरोप आला पण आण्णा ना पुण्याला हलवल्याने त्या दोन दोस्तांची दहा दिवसापूर्वी भेट होणे नियतीला मान्य नव्हते . दोस्तीची किमत जाणणारा शरद पवारासारखा राजा नाही तर दोस्तीसाठी जिवाचे रान करणारा शिवाजी आण्णा सारखा दोस्त होणे नाही कै.आण्णानी शेकडो गरीब गरजुना रोजी रोटी ला लावले त्या सर्वाकडुन व त्यांच्या चाहत्याकडुन आण्णाना भावपूर्ण श्रद्धांजली.
(ॲड गणेश आळंदीकर, सोमेश्वरनगर बारामती