बारामती : 17 वर्षीय मुलीस आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
बारामती : बारामतीतील बाबुर्डी येथे अल्पवयीन मुलीला आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी विशाल युवराज पोमणे याच्या विरोधात वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मुलीच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. बाबुर्डीतील १७ वर्षे ६ महिने वयाच्या मुलीने आत्महत्या केल्याची घटना २४ ऑक्टोबर रोजी घडली होती.
फिर्यादीत नमूद केल्यानुसार, विशाल याने वारंवार मुलीच्या घरी येत तिला त्रास दिला. घटनेदिवशी स्वतःच्या मोबाईलवरून तिच्याशी चॅटींग करत तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. खुर्ची घे, पटकन बांध, जगू देणार नाही आणि मरू देणार नाही, चांगली वागली असती तर आपल्यात भांडणे झालीच नसती, दोघांनी मरायचे अस ठरलं होतं, तू ओढणी बांध, आलोच, असे मेसेज करत तिला त्रास दिला. त्यातून अल्पवयीन मुलीने घरात लोखंडी अॅंगलला ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली.