-->
करंजेपुल परिसरात डेंग्यु सदृश्य आजाराची साथ ..औषध फवारणी ची गरज 

करंजेपुल परिसरात डेंग्यु सदृश्य आजाराची साथ ..औषध फवारणी ची गरज 

सोमेश्वरनगर ( वार्ताहर ) बारामती तालुक्याच्या पश्चीम भागात विशेषत: करंजेपुल ,सोमेश्वरनगर परिसरात चिकन गुणीया सदृष्य आजाराची साथ पसरली आहे . बहुतांश घरातुन सरसकट लोकाना पाय दुखी ,हाताच्या बोटावर सुज ,सांधे दुखीचा आजार झाला आहे.त्यापासुन बचावासाठी ग्रामपंचायत स्तरावर प्रतिबंधक जंतुनाशक औषध फवारणी करणेची गरज निर्माण झाली आहे.



       गेल्या अनेक दिवसापासुन अशी साथ असुन धडधाकट माणसाना चालता येत नाही अशी अवस्था आहे. कोरोनाचे संकट काही प्रमाणात कमी झाल्याचे जाणवत असताना या नवीन आजाराने वर तोंड काढल्याने नागरीक भयभीत झाले आहेत.
          कोरडा दिवस पाळा ,पाणी तुंबुन ठेवु नका ... डॉ. सचीन शहा ,सोमेश्वरनगर 
      सध्या नुकताच मोठा पाऊस झाला व अजुनही होत आहे त्यामुळे पावसाचे पाणी कुठेही तुंबु देवु नये ,आठवड्यातुन एक दिवस कोरडा पाळावा ,घराच्या परिसरात जंतुनाशक फवारणी करुन घ्यावी असे आवाहन येथील प्रसिद्ध डॉक्टर सचीन शहा यानी केले आहे. संपूर्ण कोरोनाकाळात एक ही दिवस दवाखाना बंद न करता येथील सोमेश्वर हॉस्पिटल चालु असुन नागरीकानी घाबरुन जावु नये, मात्र आजार अंगावर देखील काढु नये असेही डॉ.सचीन शहा यानी आवाहन केले आहे. सध्या साठलेल्या पावसाच्या पाण्याने डेंग्यु च्या आजाराची देखील शक्यता असते,त्यातच सांधे दुखी होवु नये म्हणुन जास्त काळजीची गरज असुन काही ठिकाणी गायींच्या अंगावर देखील जखमा झालेल्या आढळुन आल्या आहेत.त्यामुळे जनावरांची देखील वेळचेवेळी पशुवैद्यकीय डॉक्टराकडुन तपासणी करुन घेण्याची गरज असल्याचे ही डॉ.शहा यानी सांगीतले .


Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article