जि.प.सदस्या रोहिणी तावरे यांच्यामार्फत सवलतीच्या दरात आत्तापर्यंत ६१६१ पिठ गिरणींचे वाटप
माळेगाव - महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार यांच्या 61 व्या वाढदिवसा निमित्ताने माळेगाव पणदरे गटा मध्ये जिल्हा परिषद सदस्या सौ रोहिणी रविराज तावरे(लाखे)यांच्या माध्यमातून 6100 सर्वसामान्य लोकांना 50%सवलतीच्या दरात घरगुती पीठ गिरणी उपलब्ध करून देण्यात येत आहेत.या गिरण्या iso प्रमाणित कंपनी च्या असून 2 वर्षे वोरंटी आहे.त्यामुळे लोकांची एक जीवनावश्यक गरज या माध्यमातून पूर्ण होत आहे.
प्रत्यक्षात मात्र आज पर्यंत 11000 कुटुंबांनी नोंदणी करून या योजनेमध्ये सहभाग नोंदवला आहे. या 11000 मधील 6161 व्यां गिरणीचे वाटप बारामती पंचायत समितीचे उपसभापती प्रदीप बापू धापटे यांच्या शुभहस्ते व जिल्हा परिषद सदस्या सौ रोहिणी रविराज तावरे (लाखे) कार्यक्षम खासदार सौ सुप्रिया ताई सुळे यांचे स्वीय सहाय्यक नितीन सातव साहेब व राष्ट्रवादी भवनचे नितीन काकडे साहेब यांच्या उपस्थितीत करण्यात आले.