Baramati Big Breaking News | खांडज येथे ज्येष्ठ नागरिकाचा खून; माळेगाव पोलीसांनी खुनाचा गुन्हा उघडकीस आणत आरोपीना केली तात्काळ अटक
Thursday, May 8, 2025
Edit
माळेगाव पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील मौजे खांडज ता. बारामती जि.पुणे या गावचे हददीत काल दिनांक 07/05/2025 रोजी स. 07.00 वा.चे सुमारास शेतविहिरीत एक पुरुष जातीचे प्रेत तरंगत असले बाबतची माहीती स्थानिकांमार्फत गावचे पोलीस पाटील श्री. मुनेश राऊत यांना मिळाल्याने त्यांनी सदरची खबर माळेगाव पोलीस ठाणे येथे कळविलेली होती. त्या अनुषंगाने माळेगाव पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी स.पो.नि. श्री. सचिन लोखंडे व पोलीस उपनिरीक्षक श्री. अमोल खटावकर व इतर पोलीस स्टाफ यांनी घटनास्थळी तात्काळ भेट देवून सदरचे प्रेत विहिरीचे बाहेर काढुन सदर प्रेताची व्यवस्थित पाहणी केली असता त्यांचे डोक्याला तसेच चेहऱ्यावर मार लागलेचे खुना तसेच मयताचे मानेला साडी व दगड बांधलेला अवस्थेत मिळुन आलेले होते. त्यामुळे मयत व्यक्तीचा मृत्यू हा संशयास्पद झालेला असलेचे वाटत असल्याने व सदर कालावधीत इसम नामे श्री.शिवाजी साहेबराव रोमन रा.खांडज ता. बारामती यांनी सदरचे प्रेत हे त्यांचा भाऊ मारुती साहेबराव रोमन यांचे असलेचे सांगितलेने कायदेशीर तपास प्रकीया पूर्ण करणेसाठी वैदयकीय तपासणी व शवविच्छेदन करीता शासकीय उपजिल्हा रुग्णालय, बारामती येथे पाठविलेले होते.
यांतील मयताचे प्रेताचे शवविच्छेदन केलेनंतर संबंधित वैदयकीय अधिकारी यांनी यांतील मयत नामे मारुती साहेबराव रोमन यांचा मृत्यु हा त्यांचे डोक्यात कोणत्या करीता टणक वस्तूने मारहाण केलेने झालेला असलेचा संशय व्यक्त केलेने सदरचा मृत्यु हा नैसर्गिक किंवा आत्महत्या नसुन तो खून झालेला असलेचे निष्पन्न झालेले होते.
सदर घटनेचे घटनास्थळ परीसरात जास्त लोकवस्ती नसलेने पोलीस चौकशीचे अनुषंगाने घटनास्थळावर काहीएक उपयुक्त माहीती मिळत नसल्याने घटनेचे गांभीर्य ओळखुन स.पो.नि. श्री. सचिन लोखंडे यांनी घडले प्रकाराबाबत वरीष्ठ पोलीस अधिकारी यांना माहीती कळवुन त्यांचे मार्गदर्शनाखाली यांतील मयत नामे मारुती साहेबराव रोमन यांचे झालेल्या खूनाचे अनुषंगाने यांतील मयत व्यक्ती मारुती साहेबराव रोमन यांचा मुलगा यांतील फिर्यादी नामे श्री.विजय मारूती रोमन, वय 31 वर्षे, रा. राऊतवस्ती खांडज, ता. बारामती, जि. पुणे यांनी माळेगाव पोलीस ठाणे येथे अज्ञात आरोपीने अज्ञात कारणावरून फिर्यादीचे वडील मारूती साहेबराव रोमन वय 58 वर्षे, रा. राऊतवस्ती खांडज, ता. बारामती, जि.पुणे यांचे डोक्यामध्ये काहीतरी टणक वस्तु मारून त्यांचा खून करून त्यांचे प्रेतास गळयामध्ये काळ्या रंगाच्या साडीमध्ये दगडे बांधून पुरावा नाहीसा करण्याचे उद्देशाने कांतीलाल सयाजी माने यांचे विहीरीमध्ये टाकुन दिलेले आहे. वगैरे मजकुराचे फिर्यादीवरून माळेगाव पोलीस ठाणे येथे गुरनं -117/2025 भारतीय न्याय संहीता 2023 चे कलम 103 (1), 238 या प्रमाणे गुन्हा दाखल करुन घेवुन सदर खूनाचा प्रकार उघडकीस आणुन आरोपींचा शोध घेणेकरीता माळेगाव पोलीस ठाणे कडील गुन्हे शोध पथक तसेच इतर पोलीस अंमलदार यांची दोन पथके तपास कामी रवाना केलेली होती.
सदर गुन्हयाचे तपास दरम्यान मौजे खांडज ता. बारामती या गावचे हददीत कसुन चौकशी करुन यांतील मयत नामे मारुती साहेबराव रोमन यांचे कुटुंबातील किंवा बाहेरील कोणाशी यापूर्वी वाद विवाद झालेला होता अगर कसे? तसेच सदर मयत व्यक्ती यांस शेवटी कोणी पाहीले होते याबाबत कसुन चौकशी केली असता तपास दरम्यान गोपनीय बातमीदाराकडुन माहीती मिळाली की, मयत व्यक्ती नामे मारुती साहेबराव रोमन हा घटना घडणेपुर्वी मौजे खांडज ता. बारामती या गावात मजुरी कामासाठी बाहेरुन आलेल्या लोकांसोबत फिरताना पाहीलेचे खात्रीलायक माहीती मिळाल्याने सदर गुन्हयाचे तपासाचे अनुषंगाने यांतील मयत व्यक्तीचे प्रेत मिळुन आलेल्या विहीरी पासुन थोडे अंतरावर तात्पुरते निवारा साठी खोपी बांधुन राहणाऱ्या 1) नवनाथ शिवाजी घोगरे, वय 25 वर्षे, मुळ रा. कार्ले भाजी लोणावळा ता. मावळ जि.पुणे व 2) अनिल गोविंद जाधव, वय 35 वर्षे मुळ रा. आंबेवाडी ता. रोहा जि. रायगड यांचेकडे मारुती साहेबराव रोमन याचे बाबत चौकशी केली असता त्यांनी त्या व्यक्तीस ओळखत नसलेचे सांगुन उडवा- उडवीची उत्तरे देत होते. त्यामुळे त्यांचे घरातील मजुरी काम करणारे इतर महीलांकडे माळेगाव पोलीस ठाणेचे पोलीस पथकातील महीला अंमलदार यांनी चौकशी केली असता महीला व पुरुष मजुर हे सांगत असलेल्या माहीतीमध्ये विसंगती निदर्शनास आलेने ते पोलीस चौकशी दरम्यान काहीतरी माहीती लपवत असलेबाबत खात्री झालेने नमूद घटनेच्या अनुषंगाने अधिक सखोल चौकशी केली असता त्यांनी यातील मयत व्यक्ती हा मारुती साहेबराव रोमन हा अधुन मधुन मजुरांचे खोपीवर येत जात होता, याच ओळखीतुन मारुती साहेबराव रोमन याने मजुरी काम करणारा नवनाथ घोगरे याचे आईकडे शरीर सुखाचे मागणी केलेली होती, तो प्रकार त्या महीलीने तीचा मुलगा यांतील आरोपी क- 2 यांस सांगितलेने त्याचा राग मनात धरून यांतील मयत व्यक्ती मारुती साहेबराव रोमन यांस विश्वासात घेवुन त्यास गोड बोलुन त्या परीसरातील निर्जन स्थळी नेवुन त्याचे डोकीत दगड घालुन त्याचा खून केलेला असल्याची व मयताची ओळख पटु नये म्हणुन त्याची कपडे काढून गुन्हयाचा पुरावा नष्ट करणेचे उददेशाने ती पेटवून दिली असलेबाबत तसेच त्याचे प्रेत काही कालावधी करीता त्याच परीसरातील ऊसाचे शेतात लपवुन ठेवुन नंतर रात्रीचे अंधारात त्या प्रेताचे मयताचे हात पाय बांधुन ते प्रेत पाण्याचे वर येवु नये म्हणुन साडीने सहाय्याने मोठ्या दगडांना बांधुन विहीरीत टाकुन दिलेले असल्याचे कबूली दिलेली आहे.
त्यानंतर सदर गुन्हयाचे कामी यांतील आरोपी नामे 1) नवनाथ शिवाजी घोगरे, वय 25 वर्षे, मुळ रा. कार्ले भाजी लोणावळा ता. मावळ जि.पुणे व 2) अनिल गोविंद जाधव, वय 35 वर्षे मुळ रा. आंबेवाडी ता. रोहा जि. रायगड यांना अटक करणेत आलेली असुन सदर गुन्हयाचा पुढील अधिकचा तपास पोलीस उपनिरीक्षक श्री.तुषार भोर हे करीत आहेत.
सदरची कामगिरी ही श्री. पंकज देशमुख सो. (मा.पो.से) पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, श्री. गणेश बिरादार सो, अपर पोलीस पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, डॉ.श्री. सुदर्शन राठोड सो. उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती उपविभाग स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. अविनाश शिळीमकर यांचे मार्गदर्शनाखाली माळेगाव पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी स.पो.नि. सचिन लोखंडे, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक देविदास साळवे, अमोल खटावकर, तुषार भोर, सहा. पोलीस उपनिरीक्षक संजय मोहीते, पोलीस हवालदार सादीक सय्यद, राहुल पांढरे, विजय वाघमोडे, महीला पोलीस हवालदार रुपाली धिवार, पोलीस नाईक ज्ञानेश्वर सानप, पोलीस कॉन्टेबल ज्ञानेश्वर मोरे, अमोल राऊत, अमोल वाघमारे, अमोल कोकरे, विकास राखुंडे, जालींदर बंडगर, सागर पवार, महीला पोलीस कॉन्टेबल सुनिता पाटील यांनी केलेली आहे.