-->
सुपे येथे धक्कादायक प्रकार उघडकीस; कर्नाटकातील मजुराचा खून करत मृतदेह मातीच्या ढिगाऱ्याखाली पुरला

सुपे येथे धक्कादायक प्रकार उघडकीस; कर्नाटकातील मजुराचा खून करत मृतदेह मातीच्या ढिगाऱ्याखाली पुरला

मोरगांव - बारामती तालुक्यातील सुपा नजीक नारोळी येथे कर्नाटक राज्यातून घर बांधकाम करण्यासाठी आलेल्या गणेश शंकर चव्हाण वय 49 वर्षे हा मजूर बेपत्ता झाल्याबाबतची तक्रार सुपा पोलीस स्टेशनला प्राप्त झाली होती. यातील बेपत्ता झालेल्या व्यक्तीचा खून झाला असून तक्रार दाखल करणारे व्यक्तीनेच हा खून केल्याबाबतचा गुन्हा सुपा पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आलेला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की. दि.२४ रोजी सुपा पोलीस स्टेशन मानव मिसिंग न. २२/२०२५ प्रमाणे मिसींग तकार ही संतोष देवेंद्राप्पा लमान मुळ रा. आद्रहळी ता. शिराटी जि. गदक राज्य कर्नाटक सध्या रा. नारोळी ता. बारामती जि.पुणे, यांना दिलेली असुन त्यात त्यांचे मामा गणेश शंकर चव्हाण वय ४९ वर्षे, मुळ रा आद्रहळी ता. शिराटी जि. गदक राज्य कर्नाटक सध्या रा नारोळी ता. बारामती जि.पुणे, हे दिनांक 22 रोजी रात्री ९:३० वाचे सुमारास मौजे नारोळी ता. बारामती जि. पुणे येथील छाया रमेश महाडिक यांचे शेतातुन मिसिंग झाल्याचे सांगितले असुन सदर मिसिंगचा तपास चालु होता.

आज दि. २६ रोजी सकाळी ९.४५ वाजण्याच्या सुमारास मला महिला नामे छाया रमेश महाडिक यांचा भाऊ अशोक जयवंत ढमे याने महाडिक यांना फोन करून सांगितले की आमचे मौजे नारोळी ता. बारामती जि. पुणे येथिल शेतातील घराचे कंपाउंडचे काम चालु असलेल्या बाजुला मुरूमाचा ढिग आहे. त्यातुन उग्र वास येत आहे व दोन कुत्रे त्यातुन काहीतरी उकरून खात आहे असे सांगीतले आहे. यानंतर सहायक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे व पोलीस कर्मचारी यांनी सदर ठिकाणी भेट दिली.. सदर ठिकाणची पाहणी केली असता, सदर ठिकाणी मुरूमाचे ढिगा-यात एक पुरूष जातीची बॉडी दिसुन आली. सदर ठिकाणी फॉरेन्सीक लॅबची टीम बोलावुन घेतली व सदर बॉडीची पाहणी केली असता सदर मयत बॉडीवर तपासास असलेल्या मिसिंग न. २२/२०२५ मधील मिसिंग व्यक्ती गणेश शंकर चव्हाण वय ४९ याची मिसिंग दाखल करते वेळी देण्यात आलेले वर्णन व मयत बॉडीचे वर्णन हे एकसारखेच असल्याचे दिसुन आले. तसेच मिसिंगचे उजव्या खांदयावर गोंदलेले वाघाचे चित्र हे मयताचे उजव्या खांदयावर देखील दिसुन आले. याबाबत खात्री झाली की सदर मिसिंग व्यक्ती नामे गणेश शंकर चव्हाण वय ४९ वर्षे, मुळ रा आद्रहळी ता.शिराटी जि.गदक राज्य कर्नाटक सध्या रा नारोळी ता. बरामती जि.पुणे, व मयत व्यक्ती ही एकच आहे.

सदर मिसिंग दाखल करते वेळी मिसिंगची खबर देणारा संतोष देवेंद्राप्पा लमान यास मयत गणेश शंकर चव्हाण हा छाया रमेश महाडिक यांचे शेतावर काम करणारा काळुराम बबन देवकुळे याचे बरोबर १० ते १५ मिनिटासाठी गेला असल्याचे नागेश चंदबसप्पा बुधियाला यांने सांगीतले होते.आम्ही मिसिंगचा तपास करीत असताना काळुराम बबन देवकुळे यांने दि.२३ रोजी दिलेल्या जबाबात तो छाया रमेश महाडीक यांचे शेतावर दि.१७ रोजी पासुन कामावर गेला नाही व गणेश चव्हाण यास भेटला नसल्याचे सांगीतले. यावरून नागेश चंदबसप्पा बुधियाला याने मयत गणेश चव्हाण याची मिसींग दाखल करताना खबर देणारास दिशाभुल करणारी माहीती दिली असल्याचे दिसुन येत आहे. दि.२३ रोजी पासुन नागेश चंदबसप्पा बुधियाला हा कोणास काहीएक न सांगता फोन बंद करून कामावरून निघुन गेला आहे.

सदर मयत व इसम नामे नागेश चंदबसप्पा बुधियाला हे कामानिमित्त राहत असलेल्या छाया रमेश महाडीक यांचे काम चालु असलेल्या घरामध्ये राहत असलेल्या खोलीची फॉरेन्सीक टीमसह पाहणी केली असता, त्या खोलीमध्ये रक्त सदृश डाग असलेला चाकु मिळुन आलेला आहे. फॉरेन्सीक टीम यांनी त्यांचेकडील उपलब्ध असलेल्या अल्ट्रा व्हायलेटन लाईटचा वापर करून खोलीची सखोल पाहणी केली असता फरशीवर रक्त सदृश डाग मिळुन आलेले आहेत. सदर खोलीतील घटना घडले ठिकाणा पासुन १०० ते १५० फुट अंतरावरील कॅनॉलचे बाजुचे झाडेझुडपामध्ये मिळुन आलेल्या चटई, घोंगडे व ब्लॅकेट यावर देखील रक्त सदृश डाग दिसुन आले आहेत.

यावरून इसम नामे नागेश चंदबसप्पा बुधियाला यानेच मयत नामे गणेश शंकर चव्हाण वय ४९ वर्षे, मुळ रा आद्रहळी ता.शिराटी जि. गदक राज्य कर्नाटक सध्या रा नारोळी ता. बारामती जि.पुणे याचा २२/९/२०२५ रोजी रात्री ९:३० वाजता ते आज दि.२६.०९.२०२५ रोजी सकाळी १०.०० वाजताचे दरम्यान मौजे नारोळी ता. बारामती, जि.पुणे गावचे हददीत महिला नामे छाया रमेश महाडीक यांचे बांधकाम चालु असलेल्या फार्महाउस येथे अज्ञात कारणावरुन कोणत्यातरी हत्याराणे खुन करुन पुरावा नष्ट करण्याचे उददेशाने त्यास मुरूमाचे ढिगा-याखाली पुरून ठेवले असल्याची माहिती पुढे आल्याने नागेश चंदबसप्पा बुधियाला रा. कर्नाटक पुर्ण पत्ता माहीत नाही याचे विरूध्द कायदेशीर तक्रार नोंदवण्यात आली आहे. याबाबत पुढील तपास पो.स.ई. जीनेश कोळी करीत आहेत.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article