काकडे महाविद्यालयात रंगला जिल्हास्तरीय कुस्तीचा थरार
Friday, September 26, 2025
Edit
सोमेश्वरनगर : सोमेश्वरनगर येथील मु. सा. काकडे महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विध्यापीठ व पुणे जिल्हा विभागीय क्रीडासमिती अंतर्गत पुणे जिल्हा आंतरमहाविद्यालयीन मुले-मुली कुस्ती स्पर्धा बुधवार दि. २४/०९/२००५ रोजी पार पडल्या या स्पर्धेत पुणे जिल्हा ४० महाविद्यालयातून एकूण २९० मुले-मुली सहभागी झाली होती.
स्पर्धा मुले फ्रीस्टाईल , मुले ग्रीकोरोमन व मुली अशा तीन प्रकारामध्ये पार पडल्या मुलींच्या कुस्ती स्पर्धेमध्ये सी.टी. बोरा महाविद्यालय विजयी व मु.सा. काकडे महाविद्यालय सोमेश्वर उपविजयी झाले. मुलांच्या फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धेचे विजेतेपद कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय भिगवण यांनी मिळवले उपविजेतेपद वाघिरे महाविद्यालय सासवड यांना मिळाले मुलांच्या ग्रीकोरोमन कुस्तीचे विजेतेपद शारदाबाई पवार महाविद्यालय बारामती व उपविजेतेपद ए. सी. दिवेकर महाविद्यालय वरवंड यांनी मिळवले.
स्पर्धेचे उदघाटन प्रसिद्धी कवी प्रा. प्रदीप पाटील व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधीसभा सदस्य डॉ. रमेश गायकवाड यांच्या शुभहस्ते झाले उदघाटनप्रसंगी प्रा. पाटील यांनी खेळाडूंनी हिंदकेसरी पैलवान मारुती माने,पैलवान गणपतराव आंधळकर यांच्यासारखे महाराष्ट्राचे देशाचे नाव अंतरराट्रीय पातळीवर गाजवून महाराट्राची कुस्ती परंपरा संस्कृती हि वाढवावी असे आवाहन करून खेळाडूंना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षीय मनोगतामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांनी महाराष्ट्राला गौरवशाली कुस्ती परंपरेचा इतिहास आहे या स्पर्धेतून निवड झालेल्या खेळाडूंनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विभागीय स्तरावर यशस्वी होऊन विद्यापीठ तर्फे राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करून विद्यापीठाला कुस्तीमध्ये जास्तीत जास्त पदकं मिळवून द्यावीत त्याचप्रमाणे उपस्थित शारीरिक शिक्षण संचालक व खेळाडू यांच्या विद्यापीठ स्तरावर येणाऱ्या अडचणी व्यवस्थापन सोडविण्यासाठी प्रयत्न करीन असे आश्वासन दिले.खेळाडूंनी विद्यापीठाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन नावलौकिक वाढवावा असे आवाहन करून स्पर्धा यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
संस्थेचे अध्यक्ष सतीश भैय्या काकडे- देशमुख यांनी या स्पर्धेसाठी शुभेच्छा देऊन आशा प्रकारच्या क्रीडास्पर्धा महाविद्यालयात नेहमी घ्याव्यात असे सांगितले, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष अभिजित भैय्या काकडे- देशमुख यांनी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी शुभेच्छा दिल्या सचिव श्री सतीश लकडे यांनी खेळाडूंना आशीर्वाद दिले. दैनिक सकाळचे पत्रकार श्री. संतोष शेंडकर यांनीही खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. आंतराष्ट्रीय कुस्तीपंच दिनेश गुंड व त्यांच्या सर्व सहकार्यांनी संपूर्ण स्पर्धा ह्या यशस्वीपणे गुणदान देऊन पार पाडल्या अशी माहिती स्पर्धा संयोजन सचिव प्रा. बाळासाहेब मरगजे यांनी दिली.
याप्रसंगी पै. भारत मदने राष्ट्रीय पदकविजेत ,पै. सागर मारकड उपस्थित होते. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. जगन्नाथ साळवे , डॉ. जया कदम , डॉ. प्रवीण ताटे देशमुख , आय. क्यू. ए . सी. समन्वयक डॉ. संजू जाधव , प्रा. रजनीकांत गायकवाड तसेच महाविद्यालयाचा संपूर्ण स्टाफ उपस्थित होता . स्पर्धेचे यशस्वी संयोजयासाठी डॉ. श्रीकांत घाडगे, श्री आदित्य लकडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले प्रा. दत्तराज जगताप यांनी उपस्थितांचे आभार मानले.