
कोऱ्हाळ्यात 15 जागांसाठी तब्बल 83 अर्ज दाखल; चौरंगी लढत होणार?
Wednesday, December 30, 2020
Edit
कोऱ्हाळे बु - बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बुद्रुक गावात सुद्धा निवडणूकीचे बिगुल वाजले असून 15 जागांसाठी तब्बल 83 अर्ज दाखल झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली.
गावात एकूण 5 वार्ड आहेत.
गावात 15 जागांसाठी 83 अर्ज दाखल झाल्याने चौरंगी रंगत होणार का? याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे.
वार्ड क्रमांक 1 मध्ये एकूण 24 अर्ज दाखल झाले आहेत.
वार्ड क्रमांक 2 मध्ये एकूण 15 अर्ज दाखल झाले आहेत.
वार्ड क्रमांक 3 मध्ये एकूण 12 अर्ज दाखल झाले आहेत.
वार्ड क्रमांक 4 मध्ये एकूण 14 अर्ज दाखल झाले आहेत.
वार्ड क्रमांक 5 मध्ये एकूण 18 अर्ज दाखल झाले आहेत.