
थोपटेवाडी ग्रामपंचायत सदस्य पृथ्वीराज नलवडे यांनी सर्व मतदारांचे मानले आभार
Tuesday, January 19, 2021
Edit
कोऱ्हाळे - बारामती तालुक्यातील थोपटेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत दणदणीत विजयी मिळवण्यात यशस्वी झालेले वॉर्ड क्रमांक 3 चे उमेदवार पृथ्वीराज नंदकुमार नलवडे यांनी भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलच्या माध्यमातून सर्व सदस्य यांच्या वतीने सर्व मतदार बांधवांचे, भगिणीचे आभार मानले. तसेच थोपटेवाडी ग्रामस्थ यांनी 9 पैकी 8 उमेदवार निवडून देऊन जो भैरवनाथ ग्रामविकास पॅनेल जो विश्वास टाकला त्याला तडा जाऊ देणार नाही व या निवडणुकीमध्ये विजय खेचून आण्यासाठी प्रचार यंत्रने मध्ये दिवस रात्र ज्या तरुण मित्र, बांधव, ग्रामस्थ यांनी खुप कष्ट घेतले तेच या पॅनेलच्या विजयाचे शिल्पकार आहेत असे सागितलं.
सर्व ज्येष्ठ नागरिक यांचे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे लाभ लाभले त्या सर्वांचे मनापासून पॅनेलच्या वतीने खुप खुप आभार व्यक्त करतो. तसेच गावाच्या विकासासाठी तरुणांना सोबत घेऊन व ज्येष्ठ नागरिक यांच्या मार्गदर्शनाखाली विकास कामे जेवढ्या वेगाने करता येईल तेवढ्या आम्ही करणार आहे असे विजयी उमेदवार पृथ्वीराज नंदकुमार नलवडे यांनी सांगितलं. कोणत्याही अडचणीसाठी आम्हाला केव्हाही संपर्क करा आम्ही गावच्या विकासासाठी 24 तास आम्ही उपलब्ध असु असे त्यांनी निरा-बारामती वार्ताशी बोलताना सांगितले.