-->
बारामती; पहा कोणत्या गावात कोणाची सत्ता

बारामती; पहा कोणत्या गावात कोणाची सत्ता

बारामती तालुक्यात बहुतांश ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आली आहे. वॉर्ड निहाय पॅनेल असले तरी अन्य पक्षांना तालुक्यात फारशी संधी मिळालेली नाही.


सांगवीमध्ये सहकारमहर्षी, माळेगाव कारखान्याचे ज्येष्ठ संचालक चंद्रराव तावरे यांच्या गटाचा पराभव झाला आहे. येथील सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनेलकडे आली. दूध संघाचे संचालक प्रकाशराव तावरे, माळेगावचे संचालक अनिल तावरे, राष्ट्रवादी युवकचे माजी तालुकाध्यक्ष किरण तावरे, महेश तावरे यांच्या पॅनेलने येथे १० जागांवर विजय मिळविला. चंद्रराव तावरे यांच्या पॅनेलला पाच जागा मिळाल्या.


       निंबूतमध्ये जिल्हा परिषदेचे सभापती प्रमोद काकडे, सतीश काकडे यांच्या पॅनेलने बाजी मारली. त्यांनी १५ पैकी ९ जागा जिंकल्या. सोमेश्वरचे माजी अध्यक्ष शहाजीराव काकडे, बी. जी. काकडे, गौतम काकडे, विजय काकडे, दिलीप फरांदे  यांच्या पॅनेलला येथे सहा जागांवर समाधान मानावे लागले. परंतु प्रमोद काकडे, सतीश काकडे यांच्या पॅनेलला विरोधी पॅनेलने कडवी लढत दिली. 

 

      खंडोबाचीवाडी ग्रामपंचायतीत सोमेश्वरचे विद्यमान संचालक लक्ष्मण गोफणे यांच्या पॅनेलने ७ पैकी ५ जागा जिंकल्या. सोमेश्वरचे विद्यमान उपाध्यक्ष शैलेश रासकर व माजी संचालक दिलीप फरांदे यांच्या पॅनेलला येथे अवघ्या दोन जागा मिळाल्या. 


      राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी होळ ग्रामपंचायतीत एकहाती विजय मिळविला. सोमेश्वरचे विद्यमान संचालक सिद्धार्थ गिते यांच्या पॅनेलला येथे केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. होळकर यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने १० जागा जिंकल्या. सिद्धार्थ गिते यांच्याकडून होळकर यांनी सत्ता खेचून आणली. 

     

          वडगाव निंबाळकर ग्रामपंचायतीत निवृत्त महसूल उपायुक्त शिवाजीराव राजेनिंबाळकर, सुनील ढोले,  अनिलकुमार शहा, राजकुमार शहा यांच्या पॅनेलने सोमेश्वरचे विद्यमान संचालक संग्रामसिंह राजेनिंबाळकर, बारामती पंचायत समितीचे उपसभापती अविनाश (बाबा) शिंदे यांच्या पॅनेलचा पराभव केला. शिवाजीराव राजेनिंबाळकर यांच्या पॅनेलमधील संगीता राजकुमार शहा या बिनविरोध विजयी झाल्या होत्या. उर्वरित १६ जागांमध्ये शिवाजीराव राजेनिंबाळकर यांच्या पॅनेलने १०, संग्रामसिंह राजेनिंबाळकर यांच्या पॅनेलने ५ जागा जिंकल्या. एका जागी शिंदे यांच्या गटाचा उमेदवार विजय झाला. वॉर्ड सहामध्ये बारामती पंचायत समितीचे माजी उपसभापती अविनाश शिंदे यांचा माजी सरपंच सुनील ढोले यांनी मोठ्या फरकाने पराभव केला. वॉर्ड क्र. २ मध्ये शिंदे यांच्या पत्नीलाही पराभवाला सामोरे जावे लागले. 


         कोरहाळे बुद्रूक ग्रामपंचायत निवडणुकीत सत्तांतर झाले. सोमेश्वरचे संचालक सुनील भगत यांच्या गटाकडून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश खोमणे यांच्या गटाने सत्ता हस्तगत केली. खोमणे यांच्या पॅनेलला ८ जागा मिळाल्या. भगत यांच्या पॅनेलला ४ जागी विजय मिळाला. सोमेश्वरचे संचालक लालासाहेब माळशिकारे यांनी एका वॉर्डात तीन उमेदवार उभे केले होते. हे तिन्ही उमेदवार विजयी झाले. पंचायत समितीचे उपसभापती प्रदीप धापटे यांनी १५ पैकी नऊ जागी उमेदवार उभे केले होते. त्यांच्या पॅनेलला यश आले नाही.


कोरहाळ्यातून विभक्त झालेल्या थोपटेवाडी ग्रामपंचायतीत मात्र खोमणे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलला केवळ १ जागेवर समाधान मानावे लागले. युवकांनी एकत्रित येवून तयार केलेल्या भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलने येथे नऊ पैकी आठ जागा मिळविल्या.


        सदोबाचीवाडीमध्ये सोमेश्वरचे माजी संचालक आनंदकुमार होळकर, माजी सरपंच मनिषा होळकर यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने सर्व ९ जागी निर्विवाद वर्चस्व मिळविले. विद्यमान सरपंच विलास होळकर यांना येथे पराभवाला सामोरे जावे लागले. 

           चोपडजमध्ये प्रा. बाळासाहेब जगताप यांच्या पॅनेलने ११ पैकी ७ जागा मिळविल्या. 

        सस्तेवाडीमध्ये विकास जाधव, नवनाथ मगर यांच्या पॅनेलने नऊ पैकी सहा जागा मिळविल्या. भगवान कदम, शंकरराव होळकर यांच्या पॅनेलला तीन जागा मिळाल्या. 

निरावागज ग्रामपंचायतीत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, संपतराव देवकाते, जिल्हा बॅंकेचे संचालक मदनराव देवकाते यांच्या पॅनेलने १५ पैकी १४ जागा मिळाल्या. एका जागेवर विरोधी गटाचा उमेदवार विजयी झाला.

    

         कांबळेश्वरमध्ये पंचायत समितीचे माजी सभापती करण खलाटे यांच्या पॅनेलला पराभवाला सामोरे जावे लागले. माळेगावचे संचालक सुरेश खलाटे, गणेश खलाटे यांच्या पॅनेलने येथे ११ पैकी ८ जागा जिंकल्या. करण खलाटे यांच्या पॅनेलला तीन जागा मिळाल्या. 


              लाटे ग्रामपंचायत निवडणुकीत सोमेश्वरचे संचालक सचिन बाबा खलाटे, माजी संचालक नानासाहेब खलाटे यांच्या पॅनेलने नऊ पैकी आठ जागा मिळविल्या. दूध संघाचे माजी संचालक प्रशांत खलाटे हे स्वतः येथून एकटे निवडून आले. परंतु त्यांच्या पॅनेलचा मात्र पराभव झाला. 


       मळद ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलचे जिल्हा कार्याध्यक्ष नितीन शेंडे, तुकाराम गावडे, राजकुमार पोतेकर, दत्ता सातव यांच्या पॅनेलने १३ पैकी ९ जागी विजय मिळविला. 


     सावळ ग्रामपंचायतीत बारामती तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक दत्तात्रय आवाळे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या पॅनेलने ६ जागा मिळवल्या. भाजपचे माजी तालुकाध्यक्ष प्रवीण आटोळे यांच्या गटाला येथे पराभव पत्कारावा लागला. दत्तात्रय आवाळे हे एका पोस्टल मतामुळे विजयी झाले. तीन अपक्ष विजयी झाले आहेत.

कटफळमध्ये डॉ. संजय मोकाशी यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने ७ जागी विजय मिळविला. तीन ठिकाणी अपक्षांनी बाजी मारली. 

     

झारगडवाडीमध्ये छत्रपतीचे संचालक नारायण कोळेकर, बाजार समितीचे संचालक राजेंद्र बोरकर यांच्या पॅनेलचा विजय झाला. १५ पैकी ११ जागा त्यांनी मिळविल्या. 


     अंजनगाव ग्रामपंचायतीत सोमेश्वरचे माजी उपाध्यक्ष बी. एस. परकाळे यांच्या पॅनेलने ९ पैकी ८ जागा जिंकल्या. पिंपळीमध्ये छत्रपती कारखान्याचे संचालक संतोष ढवाण यांच्या पॅनेले नऊ जागांवर विजय मिळविला. भवानीमाता पॅनेलला चार जागांवर यश आले. 

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article