-->
वडगांव निंबाळकर पोलीसांच्या कार्यतत्परतेने टळला मोठा अनर्थ

वडगांव निंबाळकर पोलीसांच्या कार्यतत्परतेने टळला मोठा अनर्थ

वडगांव निंबाळकर वार्ताहर - लक्ष्मण गडदरे रा पळशी ता बारामती हे आज दुपारी 12:15 वा  वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनमध्ये आले. त्यांनी लांडे साहेबांना त्यांचा पुतण्या ज्ञानदेव गडदरे वय 25 हा काल घरातून भांडण करून आत्महत्या करतो असे म्हणून रागात घरून निघून गेला असलेचे सांगितले व अजून पर्यंत त्याचा काही पत्ता लागत नाही व तो दुपारी 02:00 वाजता आत्महत्या करणार आहे असे म्हणत आहे व तो फोन उचलत नाही असे सांगितले. सदर घटनेचे गांभीर्य ओळखुन तात्काळ साहेबांनी त्यांना त्यांना शोधु तुम्ही काळजी करु नका असे सांगुन त्याचा मोबाईल नंबर घेतला व लागलीच पो कॉ सिताप व भुजबळ यांना बोलावून घेऊन सदर मुलाचे मोबाईल लोकेशन काढून त्याला ताब्यात घेणे साठी सांगितले, लोकेशनवरुन तो करंजेपुल येथे असल्याचे समजले तात्काळ पोकाॅ सिताप व भुजबळ यांनी करंजेपुल येथे जावुन त्याचा शोध घेवुन त्याला ताब्यात घेवुन त्याला आत्महत्या न करण्याबाबत समजावून सांगुन त्यास त्याचे चुलते लक्ष्मण गडदरे यांचे ताब्यात सुखरूप दिले. पोलीसांच्या कार्यतत्परतेने पुढील अनर्थ टळला.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article