-->
पारंपरिक शेतीला आधुनिकीक शेतीची जोड द्या - बालाजी ताटे

पारंपरिक शेतीला आधुनिकीक शेतीची जोड द्या - बालाजी ताटे

मोरगांव :पारंपरिक शेतीला आधुनिकीक शेतीची जोड द्यावी व दर्जेदार उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांनी पिक स्पर्धेत सहभागी व्हावे असे प्रतीपादन बालाजी ताटे यांनी मोरगांव येथे  झालेल्या कार्यक्रम प्रंसंगी केले. आज  राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान अंतर्गत ऊस लागवड तंत्रज्ञान, ज्वारी पिकांविषयी  शेतकरी प्रशिक्षण वर्ग व शेतकरी    प्रदर्शनाचे आयोजन    येथील  जय गणेश मंगल कार्यालयात केले होते होते यावेळी ते बोलत होते.

 शेतकऱ्यांना शेतीविषयक  विविध  प्रश्नावर मार्गदर्शन करण्यासाठी मोरगांव ता. बारामती  येथे झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन  उपविभागीय कृषी अधिकारी बारामती  बालाजी ताटे व  तसेच  पंचायत समिती सदस्य राहुल भापकर यांच्या हस्ते झाले. यावेळी  मोरगांवचे सरपंच  निलेश केदारी,  कृषी पर्यवेक्षक सचिन फुले, माजी  पंचायत समीती सद्स्य दत्तात्रय ढोले व  शेतकरी उपस्थित होते .
    प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांना विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये   चंद्रकांत दाते  शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र बारामती यांनी ज्वारी पिकावर सखोल मार्गदर्शन केले . तद्नंतर गुरुस्वामी  शास्त्रज्ञ राष्ट्रीय अजैविक  मॅनेजमेंट संस्था माळेगाव, श्री.  निंबाळकर  ऊस विकास अधिकारी सोमेश्वर सहकारी साखर कारखाना यांनीदेखील शेतकऱ्यांना ऊस लागवड तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन केले.

या शेतकरी प्रदर्शनामध्ये परिसरातील भाजीपाला उत्पादक,  ऊस उत्पादक  प्रगतशील शेतकऱ्यांनी स्टॉल उभारणी करुन  सहभाग नोंदविला .त्याचप्रमाणे बियाणे व खत  उत्पादन कंपन्या,  शेती अवजारे ,ठिबक सिंचन उत्पादक कंपनी या सर्व स्तरातील कंपन्यांनी प्रदर्शनामध्ये उत्स्फूर्त असा सहभाग नोंदविला.


या शेतकरी प्रदर्शनाचा मोरगाव व परिसरातील 120 ते 125 शेतकऱ्यांनी लाभ घेतला. या शेतकरी प्रदर्शनाचे आयोजन कृषी विभागामार्फत प्रसाद कृषी सहाय्यक  प्रसाद तावरे तसेच कृषी मित्र बापू तावरे आणि सावकार दादा या सर्वांनी या प्रदर्शनाचे आयोजन केले .
  प्रदर्शनात जैविक  रासायनिक खतांच्या पाहणी प्रदर्शिनात  स्टॉलची पाहणी करताना 

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article