-->
कुरणेवाडी ग्रामपंचयतीच्या उपसरपंचपदी प्रीती काळभोर

कुरणेवाडी ग्रामपंचयतीच्या उपसरपंचपदी प्रीती काळभोर

कोऱ्हाळे बु(वार्ताहर) - बारामती तालुक्यातील कुरणेवाडी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच अलंकार आप्पा जगताप यांनी राजीनामा दिल्यानंतर उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली. त्यात गणपतदादा जगताप व संदीप पाटील जगताप यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या वारूळ बाबा पॅनलची गेली तीस वर्षे एकहाती सत्ता आहे. त्यामुळे तेथील उपसरपंच पदाची निवड बिनविरोध करण्यात आली. निवडीचे कामकाज ग्रामसेवक अधिकारी अस्मिता चव्हाण यांनी पाहिले. 
         निवड झाल्यानंतर कुरणेवाडी ग्रामस्थांच्या हस्ते नवनिर्वाचित उपसारपंचाचा सत्कार करण्यात आला यावेळी सरपंच संग्राम कोकरे, रावसाहेब दादा काळभोर,  सुदाम काळभोर,  वामानभाऊ काळभोर, संपतआण्णा  काळभोर, किसन काळभोर, चंद्रकांत काळभोर, हनुमंत काका काळभोर,  लालासो काळभोर, जीजाबा काळभोर, दीपक डांगे, अरविंद शिंदे, हरीचंद्र शेडगे,  धनंजय शेडगे, आबा ढाळे, शंकर गायकवाड, सोनू काळभोर,  तुषार शिंदे, मयूर शेडगे व कुरणेवाडी मधील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्थाविक संतोष काळभोर यांनी केले व आभार प्रवीण काळभोर यांनी मानले.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article