-->
उपमुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार वाघळवाडी सोसायटीच्या १६ संचालकांची बचत खाती पूर्ववत सुरू

उपमुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार वाघळवाडी सोसायटीच्या १६ संचालकांची बचत खाती पूर्ववत सुरू

सोमेश्वरनगर- वाघळवाडी सोसायटीमध्ये सुमारे ५३ लाखाच्या अपहाराबद्दल संचालक मंडळावर सन २०१३ मध्ये पोलीस कारवाई  करण्यात आली होती. कारवाईदरम्यान अपहार कालावधीत कार्यरत असलेल्या संचालक मंडळातील १६ जणांची पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सोमेश्वरनगर शाखेतील बचत खाती बंद करण्यात आली होती. या गुन्ह्यातील तपासासाठी लेखापरीक्षक व सहकार खात्याचे  चौकशी अधिकारी यांचे सहकार्य घेण्याबाबतचे मत न्यायालयाने नोंदविले होते.
सहकार खात्याच्या कलम ८८ नुसार चौकशी करण्यात आल्यानंतर संचालक मंडळाकडून कुठलीही येणे बाकी नसून त्यांची बचत खाती पूर्ववत सुरु करण्यासाठी बारामतीचे सहायक निबंधक एस. एस. कुंभार यांनी दि.२८/१०/२०१६ रोजी जिल्हा बँकेच्या सोमेश्वर शाखा व्यवस्थापकांना पत्र दिले होते परंतु तरीदेखील दोषमुक्त संचालकांची खाती सुरू करण्यात आली नव्हती. याबाबत  बारामती शहर राष्ट्रवादी शिक्षक सेलचे अध्यक्ष अविनाश सावंत ,समर्थ ज्ञानपीठ चे अध्यक्ष अजिंक्य सावंत, ग्रामपंचायत सदस्य हेमंत गायकवाड, तुषार सकुंडे व संचालक अनिल शिंदे, समीर जाधव यांनी  उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन निवेदन दिले होते व दोषमुक्त संचालकांची खाती लवकरात लवकर सुरू करण्याबाबत संबंधितांना आदेश देण्याची विनंती केली होती.त्यानुसार बारामतीचे सहाय्यक निबंधक एस.एस.कुंभारसो यांनी त्वरित वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे स. पो. नि.सोमनाथ लांडे साहेब यांना पत्र देऊन वाघळवाडी सोसायटीच्या तत्कालीन संचालकांची बचत खाते सुरू करण्याबाबत पुणे जिल्हा बँकेच्या सोमेश्वर शाखा व्यवस्थापकांना पोलीस तपासादरम्यान बंद करण्यात आलेल्या संचालकांची बचत खाती सुरु करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याबाबत अवगत केले होते .त्या पत्राची तत्काळ दखल घेत स.पो .नि.सोमनाथ लांडे साहेब यांच्या सूचनेनुसार वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे श्री.कुलकर्णी साहेब यांनी जिल्हा बँकेच्या सोमेश्वर शाखा व्यवस्थापकांना पत्र देऊन १६ संचालकांची बचत खाती पूर्ववत सुरू करण्याबाबतचे पत्र दिले.सदर
पत्रानुसार शाखाधिकारी श्री.गायकवाड साहेब यांनी संचालकांची नावे व बचत खाते क्रमांक घेऊन बचत खाती सुरु करण्याबाबतची कार्यवाही सुरू केली असून तब्बल सात वर्षांनी दोषमुक्त संचालकांची बचत खाती सुरू होत असल्यामुळे त्यांना पिक कर्ज, मध्यम मुदत कर्ज व दीर्घ मुदत कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे त्याबद्दल तमाम शेतकरी वर्गात उपमुख्यमंत्री मा.अजित दादा पवारसो व त्वरित कार्यवाही करणाऱ्या अधिकारी वर्गाबद्दल समाधानाची भावना निर्माण झाली आहे.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article