
सोमेश्वर साखर कारखान्याची निवडणूक जाहीर?
Thursday, February 11, 2021
Edit
कोऱ्हाळे बु|| - पुणे जिल्ह्यात नंबर 1 ची आर्थिक परिस्थिती असलेल्या श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाल्याची माहिती अधिकृत सुत्रांनी दिली. मागील वर्षीच निवडणूक होणार होती परंतु कोरोना महामारीमुळे सहकारातील सर्व निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या कोरोना बऱ्यापैकी कमी झाल्याने सहकार निवडणूक प्राधिकरणाने सोमेश्वरची निवडणूक लावली आहे. निवडणुकीसाठी दि.15 ते 22 फेब्रुवारी नामनिर्देशन पत्र दाखल करणे, नामनिर्देशनाची छाननी 23 फेब्रुवारी रोजी, नामनिर्देशन मागे घेणे 24 फेब्रुवारी ते 10 मार्च 21 मार्च ला मतदान तर 24 मार्च रोजी मतदान होणार आहे. सुमारे 30 हजार सभासद असलेल्या सोमेश्वरवर 1992 पासून मा.अजितदादा पवार यांची सत्ता आहे. निवडणुकीत विरोधक पॅनल टाकणार की बिनविरोध होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.