
सोमेश्वर कारखान्याची निवडणूक जाहीर; कार्यकारी संचालकांची माहिती, निरा-बारामती वार्ताचा अंदाज खरा
Friday, February 12, 2021
Edit
निरा-बारामती वार्ता ने रात्री सोमेश्वर कारखान्याची निवडणूक जाहीर व त्यामध्ये निवडणूक कार्यक्रम तारीख जाहीर केली होती ती आज खरी ठरली. कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी अधिकृत दुजोरा दिला.
बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून दि १५ तारखेपासून निवडणुकीला सुरुवात होत आहे.
गेल्या एक वर्षापासून सोमेश्वर ची निवडणूक होणार होणार मात्र झाली नाही. मात्र आज कारखान्याच्या निवडणूक कार्यक्रमावर शिक्कामोर्तब झाले.
१५ ते २२ फेब्रुवारी- अर्ज भरणे
२३ फेब्रुवारी छाननी
२४ फेब्रुवारी यादी प्रसिद्ध
२४ फेब्रुवारी ते १० मार्च - अर्ज माघारी
१२ मार्च अंतिम यादी प्रसिद्ध आणि चिन्ह वाटप
२१ मार्च मतदान
२३ मार्च मतमोजणी