-->
वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनला 'स्टेशन ऑफ दि मंथ' चा पहिला पुरस्कार

वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनला 'स्टेशन ऑफ दि मंथ' चा पहिला पुरस्कार

बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनला स्टेशन ऑफ दि मंथ चा उत्कृष्ट पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. 
         पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख साहेब यांनी प्रत्येक महिन्याला उत्कृष्ट काम करणाऱ्या पोलीस ठाण्यास पोलीस स्टेशन ऑफ द मंथ ( सर्वउत्कृष्ट पोलीस स्टेशन)असा पुरस्कार सुरू केला आहे. सदरचा पुरस्कार हा गुन्हे उघडकीस आणणे, चोरीस गेलेली मालमत्ता हस्तगत करणे, फरार आरोपी शोधणे,आरोपींना शिक्षा लागणे, अवैध हत्यार पकडणे, पासपोर्ट, मुद्देमाल निर्गती, तक्रारी अर्जाची निर्गती ट्रॅफिक कारवाया अशा प्रकारच्या सर्वोत्कृष्ट कारवाया करणाऱ्या पोलीस ठाण्याची निवड पोलीस स्टेशन ऑफ द मंथ म्हणून केली जाते. बारामती तालुका पोलीस स्टेशनची जानेवारी २०२१ साठी सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे म्हणून निवड करण्यात आली आहे. यापूर्वी बारामती तालुका पोलिस स्टेशन हे १८ व्या क्रमांक वर होते. आता प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. सदरचा पुरस्कार विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र  मनोज लोहिया यांनी बारामती तालुका पोलीस स्टेशन चे प्रभारी पोलीस निरीक्षक  महेश ढवाण यांना देवून गौरव केला.
          तसेच गुन्हे शोध पथकाने गोपनीय माहिती काढून सर्वउत्कृष्ट कारवाई करून बेकादेशीरपणे  विक्रीस आणलेले १२ पिस्टल  हस्तगत केल्याने गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलिस निरक्षक योगेश लंगुटे, कॉन्स्टेबल नंदू जाधव,विजय वाघमोडे,विनोद लोखंडे,राहुल पांढरे यांचा बहिर्जी नाईक पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक  अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक .मिलिंद मोहिते, विवेक पाटील,उपविभागीय अधिकारी  नारायण शिरगावकर व पुणे ग्रामीण दलातील सर्व  अधिकारी उपस्थित होते.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article