-->
अंगारीका चतुर्थी दिवशी अष्टविनायकापैकी सात गणपती मंदिर दर्शनासाठी राहणार बंद

अंगारीका चतुर्थी दिवशी अष्टविनायकापैकी सात गणपती मंदिर दर्शनासाठी राहणार बंद

मोरगांव :  कोरोना या विषाणूजन्य आजाराच्या अनुषंगाने शासनाने दिलेल्या आदेशानुसार  दि. २ मार्च  रोजी अंगारीका चतुर्थी दिवशी अष्टविनायकापैकी सात गणपती मंदिर सर्व भक्तांना  दर्शनासाठी बंद राहणार आहेत. तर सिद्धटेक येथील मंदिर काही अटी व नियमांनुसार सुरु राहणार आहे. मात्र कोव्हीड १९ मुळे   परगावातील भक्तांनी येथे  येण्याचे टाळावे असे आवाहन चिंचवड देवस्थानचे  विश्वस्त विनोद पवार यांनी केले आहे . 
     अष्टविनायकापैकी प्रथम तीर्थक्षेत्र  असलेले मोरगाव तसेच  थेऊर, रांजणगाव, ओझर, लेण्याद्री, पाली,  महड  ही  गणपती मंदिर उद्या अंगारीका चथुर्तीच्या दिवशी सर्व भावीकांना  दर्शनासाठी बंद राहणार आहेत.  शासनाच्या वतीने सर्व तिर्थक्षेत्रांना आदेश काढुन मंदिर बंद ठेवण्यास सांगतले आहे .यानुसार सर्व देवस्थान ट्रस्टने हा निर्णय घेतला आहे . तसेच चिंचवड येथील श्रीमान महासाधु मोरया गोसावी समाधी मंदिरही  दर्शनासाठी बंद ठेवले जाणार आहे . त्या बाबतचा आदेश पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी  दिला आहे .
         अहमदनगर जिल्ह्यातील सिद्धटेक मंदिर सोशल डिस्टन्स, सामाजीक  अंतर पाळणे आदी अटी व शर्तींवर सुरु राहणार आहे. मंदीरात टप्प्याने  भक्तांना सोडले जाणार आहे . मात्र परगावातील गणेश भक्तांनी उद्या अंगारीका चथुर्तीच्या दिवशी  श्रींच्या दर्शनासाठी येण्याचे   टाळावे . तसेच  मंदिर व मंदिर परीसरात गर्दी करु नये  असे आवाहन चिंचवड देवस्थान ट्रस्ट व कर्जत  तहसील  यांकडून केले जात आहे . 
       मंदिर बंद काळात  परंपरेने चालत आलेले सर्व धा र्मिकविधी, पुजा-अर्चा सर्वच तीर्थक्षेत्री   होणार आहेत. दि. ३ मार्च रोजी नेहमीप्रमाणे भक्तांना श्रींचे दर्शन घेता येणार आहे.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article