
कोऱ्हाळेत आज 17 जण कोरोना पॉझिटिव्ह
Thursday, April 1, 2021
Edit
कोऱ्हाळे बु|| - तालुका आरोग्य विभागाच्या वतीने आज कोऱ्हाळे बु गावात ऍन्टीजन तपासणी कॅम्प मध्ये तब्बल १७ जण कोरोना बाधित सापडली असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी दिली.
आज कोऱ्हाळे गावात विक्रमी २०३ जणांची ऍन्टीजन तपासणी करण्यात आली. यामध्ये सुरप स्पेडर पाच जण तर इतर १२ जण पॉझिटिव्ह आले आहेत. तालुक्यातील काटेवाडी, गुणवडी, माळेगाव, पणदरे आणि कोऱ्हाळे ही गावे हॉटस्पॉट म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. बारामती आरोग्य विभागाच्या वतीने या हॉटस्पॉट गावामधून कॅम्प द्वारे तपासणी करण्यात येत आहेत. आज कोऱ्हाळे येथे तपासणीत करताना १७ जण पॉझिटिव्ह सापडेल आहेत. उद्या काटेवाडी या गावात तपासणी करण्यात येणार आहे.