-->
वाघळवाडी; कोरोना लसीकरणाला महिलांची सर्वाधिक पसंती; दोन दिवसांत 387 जणांनी घेतली लस

वाघळवाडी; कोरोना लसीकरणाला महिलांची सर्वाधिक पसंती; दोन दिवसांत 387 जणांनी घेतली लस

सोमेश्वरनगर - देशात कोरोना लसीकरण सुरू झाले असून आता ग्रामीण भागात देखील लसीकरण सुरू करण्यात आले आहे. बारामतीमधील वाघळवाडी येथील नागरिकांना  कोविड लसीकरणास सुरुवात झाली आहे. यामध्ये महिलांनी सर्वाधिक उपस्थित दर्शवत गावातील पहिल्या दिवशी 162 नागरिकांनी लस घेतली. दुसऱ्या दिवशीच्या लसीकरण मोहिमेत 225 जणांचे लसीकरण करण्यात आले.काल झालेल्या 162 जणांचे लसीकरण मिळून असा 387 जणांना पहिला डोस देण्यात आला.
    
    वाघळवाडी येथे  कोविड लसीकरण मोहिमेचे उदघाटन पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोदकाका काकडे यांच्या हस्ते पार पडले.  बारामती पंचायत समितीच्या सभापती निता फरांदे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थितीत होत्या. अध्यक्षस्थानी सरपंच नंदा सकुंडे होत्या. उद्घघाटन कार्यक्रम प्रसंगी उपसरपंच जितेंद्र सकुंडे, राष्ट्रवादीच्या महिला सरचिटणीस सुचेता साळवे, सदस्य हेमंत गायकवाड,पांडुरंग भोसले, माजी सरपंच राजेंद्र काशवेद, माजी उपसरपंच विजय गायकवाड, युवा कार्यकर्ते तुषार सकुंडे, सोसायटीचे संचालक अनिल, ग्रामविकास अधिकारी  सुभाष चौधर, सोसायटीचे संचालक अनिल शिंदे,सदस्या सुरेखा सावंत,चेतन गायकवाड, सुभाष शिंदे उपस्थित होते.
           सभापती प्रमोद काकडे उदघाटन कार्यक्रम प्रसंगी म्हणाले की, लसीकरण करण्यासाठी नागरिकांना त्रास होयला नको म्हणून आपण गाव पातळीवर उपकेंद्र स्तरावर लसीकरण उपलब्ध करून दिले आहे. यामुळे सर्व 45 आणि 65 वर्ष वरील नागरिकांना आरोग्य विभागाच्या वतीने लसीकरण टप्याटप्याने करण्यात येईल. लस सगळ्यांना पुरेल अशी व्यवस्था आरोग्य विभागास करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.
      या लसीकरण मोहिमेला राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संभाजी होळकर यांनी सदिच्छा भेट दिली.
    यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र होळ यांच्या माध्यमातून  तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली वाघळवाडी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे आरोग्य समुदाय अधिकारी योगिता माळी, आरोग्य सेवक परवेझ मुलानी, आरोग्य सेविका कुसुम शिंदे, गौरी जाधव तसेच आशा सेविका लता सावंत, शैला जाधव, रोहिणी ताटे,मालन साठे यांनी लसीकरण मोहिमेत नागरिकांना लसीकरण केले.
     ज्यांनी अद्याप लस घेतली नाही अश्या नागिरकांना सुद्धा वाघळवाडी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथे लस देण्यात येणार आहे.दोन दिवस केलेल्या लसीकरण बद्दल ग्रामपंचायतीच्या वतीने आरोग्य विभागाच्या सर्व कर्मचारी वर्गाचे गुलाब पुष्प देऊन अभिनंदन करून आभार मानण्यात आले. 

सभापती प्रमोदकाका काकडे यांच्या विशेषप्रयत्नातुन वाघळवाडी गावातील  नागरिकांना जाण्या-येण्याचा त्रास होऊ नये. आणि जेष्ठाना गावातच लस मिळावी. यासाठी उपकेंद्रांच्या माध्यमातून लसीकरण करण्यात येत आहे दोन दिवस झालेल्या लसीकरनात 387 जणांनी उत्स्फूर्तपणे नागरीकांनी लस घेतली असून गावातील 45 आणि 60 वर्ष वरील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार असून याचा लाभ सर्वानी घ्यावा.असे आवाहन सरपंच नंदा सकुंडे आणि उपसरपंच जितेंद्र सकुंडे यांनी केले.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article