
बारामतीतील 6 दुकाने सील, व्यापाऱ्यांना प्रशासनाचा दणका, कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याने कारवाई
Tuesday, April 6, 2021
Edit
बारामती - पुणे जिल्ह्यात कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी जमावबंदी लागू करण्याचे आदेश दिले आहेत. पाच पेक्षा अधिक लोकांनी एकत्र आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे आदेश जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या बारामतीच्या सहा व्यापाऱ्यांचं दुकान सात दिवसासाठी बंद ठेवण्याचे फर्मान बारामतीच्या तहसीलदारांनी काढलं आहे. बारामती शहरातील काही ठिकाणांवर जमावबंदी चे पालन होतं नसल्याचे पुरावे बारामती शहर पोलिसांनी तहसीलदार यांचेकडे दिल्यानंतर बारामतीच्या तहसीलदारांनी राजहंस वाईन, अजिंक्य बझार, के मार्ट, धुपरे भेळ, भारत बेकरी, आणि नोबल वॉच-मोबाईल शॉपी या दुकानांना सील लावून सात दिवसासाठी बंद करण्याचे आदेश तहसीलदार विजय पाटील यांनी बारामती शहर पोलिसांना दिले आहेत.