
नागरिकांनी व दुकानमालकांनी शासनाच्या आदेशाचे पालन करा अन्यथा कारवाई - एपीआय सोमनाथ लांडे
Tuesday, April 6, 2021
Edit
बारामती- काल रात्री उशिरा जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी पुणे जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व अस्थापना बंद करण्याचे आदेश काढले असून त्या आदेशाचे पालन सर्व नागरिकांनी व दुकानमालकांनी करावे असे अवाहन वडगांव निंबाळकर पोलिस स्टेशनचे एपीआय सोमनाथ लांडे यांनी साप्ताहिक निरा-बारामती वार्ताशी बोलताना सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांनी उशिरा आदेश काढल्याने अजून ते सर्व नागरिकांना माहिती नसून त्याची जनजागृती करण्याचे काम चालू आहे.
सकाळी 9 वाजता दररोज प्रमाणे दुकानमालकांनी आपापली दुकाने उघडली पण ज्यांच्यापर्यत तो आदेश पोहचला त्यांनी आपली दुकाने बंद केली, राहिलेली दुकानेसुद्धा हळूहळू बंद होऊ लागली आहेत. सगळीकडे नियमांचे पालन करावे लागणार आहे अन्यथा कायदेशीर किंवा दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
जिल्हाधिकारी यांनी जाहीर केलेल्या आदेशानुसार पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भाग, ग्रामपंचायती, नगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती व छावणी परिषदेच्या हद्दीत लॉकडाउनची मुदत 30 एप्रिल 2021 रोजी रात्री बारा वाजे पर्यंत वाढविण्याचा आदेश दिला आहे.
अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत चालू राहणार आहेत. अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळून इतर सर्व दुकाने 30 एप्रिलपर्यंत बंद राहणार आहेत.