
देशात दर मिनिटाला २ जणांचा मृत्यू, २४३ नवे रुग्ण
Monday, April 26, 2021
Edit
कोऱ्हाळे बु- कोरोना रुग्ण संख्येच्या उद्रेकामुळे देशात हाहाकार माजला आहे. दररोज तीन लाखाहून अधिक करून रुग्ण आढळत आहेत रविवारी तीन लाख 49 हजार नव्या रुग्णांची भर पडली.
या रुग्णसंख्येच्या सरासरीनुसार देशात दर मिनिटाला सुमारे 243 जण कोणाच्या विळख्यात अडकत आहेत तर मिनिटाला दोघांचा मृत्यू होत असल्याचे भयाण वास्तव समोर येत आहे. कोरोना संसर्गाच्या या सुनामीमुळे देशाच्या आरोग्य सेवेवर प्रचंड ताण आला आहे. देशात सलग चार दिवस तीन लाखाहून अधिक रुग्ण वाढ होत आहे. तीन दिवसात हा आकडा दहा लाखांवर गेला आहे.
काही महिन्यांपूर्वीच या परिस्थितीचा विचार करता हा मोठा फरक असल्याचे दिसते. यापूर्वी भारताला दहा लाख रुग्ण संख्या टप्पा पार करण्यासाठी सुमारे 65 दिवसांचा कालावधी लागत होता गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये कोरोनाचा पीक होता. त्या वेळी दहा लाख रुग्ण संख्या टप्पा पार करण्यासाठी सुमारे अकरा दिवसांचा कालावधी लागला होता ही आकडेवारी लक्षात घेता या वाढीचा वेग प्रचंड आहे हे लक्षात येते. त्यामुळे सर्व प्रशासकीय यंत्रणांचे आरोग्य सेवांवरही कमालीचा ताण येत आहे.