-->
Big Breaking: बारामतीत म्युकर मायकोसिसचा पहिला बळी

Big Breaking: बारामतीत म्युकर मायकोसिसचा पहिला बळी

बारामती : बारामती परिसरात म्युकरमायकोसिसचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने आता बारामतीकरांपुढे नवीन संकट उभे ठाकले आहे. गेल्या दहा दिवसांत बारामतीत म्यूकरमायकोसिसच्या तब्बल 19 शस्त्रक्रिया झाल्या आहेत. या विषाणूने बारामतीत पहिला बळी घेतला.


बारामती शहरातील एका महिलेचा म्यूकरमायकोसिसने आज मृत्यू झाला आहे. या महिलेवर तीन दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया झाली होती. मात्र, या विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने उपचारांना प्रतिसाद न दिल्याने त्यांचा मृत्यू झाला.

बारामतीत गेल्या दहा दिवसांत अठरा जणांवर शस्त्रक्रियेची पाळी आल्यानंतर आता प्रशासनही अँक्शनमोडमध्ये आले आहे.एकीकडे कोरोनाची स्थिती झपाट्याने सुधारत असताना दुसरीकडे या विषाणूचा संसर्ग वाढू लागल्याने सर्वांच्याच चिंतेत भर पडली आहे.

बारामतीमध्ये आसपासच्या सहा तालुक्यांतून म्युकर मायकोसिसचे रुग्ण उपचारासाठी येत असल्याची माहिती डॉ. वैभव मदने यांनी दिली आहे. स्वतः मदने यांनीच गेल्या दहा दिवसांत विविध रुग्णालयांत 18 शस्त्रक्रिया केल्या आहेत. नटराज नाट्य कला मंडळाच्या वतीने घेतलेल्या शिबीरात 14 जणांना या रोगाची लक्षणे आढळली होती.बारामतीत आता या नव्या संकटाने लोकांची चिंता वाढली आहे. प्रत्येकाने स्वतःची काळजी घेत यासंदर्भातील कोणतीही लक्षणे आढळल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article