
रेशनींग कार्ड करा घरबसल्या अपडेट, नोंदवा कुटुंबातील सदस्याची नावे, कशी करणार नोंदणी जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
Friday, May 21, 2021
Edit
कोरोना व्हायरसचा वाढता फैलाव आणि लॉकडाऊनमुळे देश आणि राज्यासमोर संकट निर्माण झाले आहे. आर्थिक व्यवहार बंद असल्याने गरीब आणि हातावर पोट असलेल्यांवर अनेक ठिकाणी उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने गरिबांना मोफत आणि कमी किमतीत धान्य देण्याची योजना हाती घेतली आहे. गरिबांसाठी रेशन कार्ड हे अत्यंत महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. अनेक सरकारी योजनांसाठी रेशन कार्ड अनिवार्य आहे.
केंद्र सरकारने नुकतीच ‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ योजना लागू करण्याची घोषणा केली आहे. रेशन कार्डमध्ये कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या नावाची नोंदणी करायची राहिली असल्यास ती कशी करायची, घरबसल्या रेशन कार्ड कसं अपडेट करायचं हे जाणून घेऊया
घरबसल्या ऑनलाईन अशी अपडेट करा माहिती :
१)रेशन कार्डमध्ये माहिती अपडेट करण्यासाठी राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्या.
http://mahafood.gov.in/website/english/home.aspx
२)वेबसाईटवर लॉगिन आयडी तयार करावा लागेल.
३)वेबसाईटच्या नव्या सदस्या मनचे नाव समाविष्ट करण्याच्या पर्यायावर क्लिक करा.
४)ओपन झालेल्या फॉर्ममध्ये, सदस्याच्या नावाची नोंदणी करायची आहे त्याची संपूर्ण माहिती भरा.
५)आवश्यक डॉक्युमेंट्सची स्कॅन कॉपी अपलोड करा.
६)नंतर फॉर्म सबमिट करा.
७)नंतर फॉर्म ट्रॅक करण्यासाठी एक रजिस्ट्रेशन नंबर मिळेल.
८)फॉर्म आणि डॉक्युमेंट्स अधिकार व्हेरिफाय करतील.
सर्व माहिती योग्य असेल तर फॉर्म स्वीकारण्यात येईल.
पोस्टाद्वारे रेशन कार्ड घरच्या पत्त्यावर पाठवण्यात येईल.