
शामराव काकडे यांची महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनच्या शासननियुक्त संचालकपदी निवड
Thursday, May 20, 2021
Edit
कोऱ्हाळे- बारामती तालुक्यातील शामराव साहेबराव काकडे यांची महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनच्या शासन नियुक्त संचालकपदी निवड करण्यात आली आहे.
शामराव काकडे हे गेली ३२ वर्ष महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनच्या संचालकपदी काम पाहत आहेत. तसेच चार वर्षे त्यांनी उपाध्यक्षपदी काम पाहिले आहे. त्यांची पुन्हा शासन नियुक्त संचालकपदी निवड करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या उत्पादनाचे मार्केटिंग करण्यासाठी काका नेहमी आग्रही असल्याने त्याचा त्यांना फायदा झाला आहे. पुणे जिल्ह्यातील सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.