
बारामती तालुक्याच्या पश्चिम भागात राजमाता अहील्यादेवी होळकर जयंती मोठ्या उत्साहात संपन्न
Monday, May 31, 2021
Edit
मोरगाव : बारामती तालुक्याच्या पश्चिम भागातील पुण्यश्लोक राजमाता अहील्यादेवी होळकर जयंती आज मोठ्या उत्साहात संपन्न झाली. सोशल डिस्टन्स पाळत मोरगावसह परीसरातील ग्रामपंचायत सरपंच व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जयंती साजरी करण्यात आली.
तालुक्यातील मोरगाव, तरडोली, पळशी, मासाळवाडी, आंबी, आदी परीसरात आज पुण्यश्लोक अहील्यादेवी होळकर जयंती उत्साहात संपन्न झाली. यावेळी मोरगाव येथे सरपंच निलेश केदारी, ग्रामसेवक मोरेश्वर गाडे, सामाजिक कार्यकर्ते आबा गायकवाड यांनी तर तरडोली येथे सरपंच नवनाथ जगदाळे, उपसरपंच महेंद्र तांबे, ग्रामसेवीका रुपाली म्हेत्रे आदी उपस्थित होते.
अहील्यादेवी यांच्या प्रतीमेला हार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली. कोरोना या विषाणूजन्य आजारामुळे सोशल डिस्टन्स पाळत साध्या पध्दतीने जयंती साजरी केली.