-->
बारामती; करंजेपुल येथे विनाकारण फिरणाऱ्यावर वडगांव निंबाळकर पोलिसांची कारवाई;  ७ दुचाकी जप्त करत ७ हजार ५०० चा दंड वसूल

बारामती; करंजेपुल येथे विनाकारण फिरणाऱ्यावर वडगांव निंबाळकर पोलिसांची कारवाई; ७ दुचाकी जप्त करत ७ हजार ५०० चा दंड वसूल

कोऱ्हाळे बु- बारामती तालुक्यातील करंजेपुल येथे
 वडगाव निंबाळकर पोलिसांनी रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करत १५ वाहनांवर कारवाई केली. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार ७ दुचाकी वाहने जप्त करण्यात आली तर ७ हजार ५०० रुपये दंडाची वसुली करण्यात आली. सोमवारी (दि.१७) रोजी सकाळी करंजेपुल येथील मुख्य चौकात ही कारवाई करण्यात आली. वडगाव निंबाळकर पोलिसांनी लॉकडाऊन काळात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर सातत्याने कारवाई सुरु ठेवली आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता पोलिसही नागरीकांची काळजी घेताना दिसत आहेत. कारवाई करतेवेळी पोलिस आणि वाहनचालक यांच्यात वादाचे प्रसंगही घडत असतात मात्र पोलिस अधिकारी आणि कर्मचारी नागरीकांना सहकार्य करत तर कायद्याचा बडगा उगारत आपले काम करत आहेत.
           लॉकडाऊन संपेपर्यंत नागरीकांनी कोरोनाचे सर्व नियम पाळावेत तसेच विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन वडगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी केले आहे. यापुढेही ही कारवाई सुरुच राहणार असल्याचे लांडे यांनी स्पष्ट केले आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक योगेश शेलार, कर्मचारी नितीन बोराडे, गौतम लोकरे, महादेव साळुं, रमेश नागटिळक तसेच होमगार्ड आसिफ शेख, गौरव म्हेत्रे आणि सुनिल बामणे यांनी या कारवाईत  सहभाग घेतला.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article