-->
बारामती; अवैध दारु विक्रीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई; ४ जणांवर गुन्हे दाखल करत ५७ हजारांचा मुद्देमाल जप्त

बारामती; अवैध दारु विक्रीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई; ४ जणांवर गुन्हे दाखल करत ५७ हजारांचा मुद्देमाल जप्त

बारामती :  सुपे ता. बारामती  येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने अवैध दारु विक्रीवर धडक कार्यवाही केली.  यामध्ये एकूण चार लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून हातभट्टी दारु व दारु बनविण्यासाठी  रसायण  असे एकूण सत्तावन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नाश करण्यात आलेला आहे.
        राज्य उत्पादन शुल्क विभागाला बारामती तालुक्यातील सुपे येथे अवैध दारू विक्री व हातभट्टी विक्री होत असल्याची माहिती मिळाली . यानंतर  राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपायुक्त प्रसाद सुर्वे, अधीक्षक संतोष झगडे, उपाधीक्षक संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विजय मनाळे, महिला जवान नीलम धुमाळ, विजय विंचुरकर, अशोक पाटील यांनी या अवैध व्यवसायावर धडक कार्यवाही केली.
       यामध्ये एकूण चार लोकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पैकी आकाश मच्छिंद्र रायते  रा. सुपा ता बारामती, बटवरा भोलेराज नानावत रा. खोर ; ता.बारामती  या आरोपीस ताब्यात घेतले आहे. या कार्यवाहीत एकुण सत्तावण हजार ७२५ रुपयांची २२२ लिटर हातभट्टी  दारु, तर दारु बनविण्यासाठी  १७५० लिटर रसायन ताब्यात घेऊन नष्ट केले आहे.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article