
संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या मोजणीचे काम शेतकऱ्यांनी पाडले बंद
उंडवडी : जराडवाडी (ता. बारामती) येथील शेतकऱ्यांनी आज संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या मोजणीला अडथळा आणत मोजणीचे काम बंद पाडले. बारामती-पाटस अर्थात संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे नूतनीकरणासाठी शासनाकडून मोजणीचे काम सुरु आहे. मात्र या महामार्गावर जमिन भूसंपादन होत असलेल्या शेतकऱ्यांना जून 2020 मध्ये भूसंपादन मोबदला संबंधित शेतकऱ्यांना नोटिसा मिळालेल्या होत्या.
तेव्हापासून शेतकऱ्यांनी सर्व त्या कागदपत्रांची पूर्तता करून देखील, प्रशासनाकडून अद्यापही मोबदला मिळालेला नाही.
गेल्या अकरा महिन्यांपासून जराडवाडी हद्दीतील शेतकऱ्यांना अद्यापही जमिन भूसंपादनचा मोबदला मिळालेला नाही. जोपर्यंत आम्हाला आमचा भूसंपादन मोबदला मिळणार नाही, तोपर्यंत आम्ही काम करू देणार नाही. शेतकऱ्यांनी पवित्रा घेतल्याने संबंधित मोजणी कर्मचाऱ्यांना मोजणी सोडून जावे लागले. शेतकरी अमोल जराड व शरद गवळी यांनी दिली.