
पाणी वापर संस्थांमध्ये शेतकऱ्यांचे शोषण; १/२ एकरवाले पाणीपट्टी भरून कर्जबाजारी; नेते मात्र २०/२५ एकराची १/२ एकराएवढी पाणीपट्टी भरून करोडपती!!
Saturday, May 29, 2021
Edit
को-हाळे बु ।।- बारामती व इंदापुर तालुक्यातील शेती पिकासाठी वरदान असलेल्या निरा डावा कालव्यावरील अस्तीत्वात असलेल्या सर्वच पाणीवापर संस्थांकडून मोठ्या प्रमाणात शेतरकऱ्यांचे शोषण केले जात आहे. या प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी लक्ष घालण्याची मागणी होत आहे.
पुणे जिल्ह्यात कोणतीही संस्था छोटी अथवा मोठी असो सर्वांना विश्वासात घेऊन संस्थेचा कारभार पारदर्शक चालला पाहिजे अशी अजितदादांची अपेक्षा असते शासनाच्या पाटबंधारे विभागाने १२ वर्षापुर्वी शेती पाण्याची जबाबदारी पाणी वापर संस्थांकडे टाकून संस्थेच्या सचिवांना हाताशी धरुन कॅनॉल, फाट्यावर असणारे हजारो सायफनधारांकडून मलिदा चाखत आहेत. बऱ्याचश्या संस्थेवर साखर कारखान्याच्या संचालकांचे वर्चस्व असून स्वत: एक दोन एकराची पट्टी फाडून २०/२५ एकर क्षेत्र भिजवत आहेत. इतर शेतकऱ्यांकडून अध्यक्ष, सचिव, पावसाळी हिवाळी, उन्हाळी पाणीपट्टीदराने पाणी न वापरताच कारखान्याच्या ऊस बिलातून वसुली करत आहेत. गेली वर्ष अनेक संस्थांच्या निवडणूका झाल्या नाहीत. बऱ्याचश्या संस्थांचे ऑडीट नाही, वार्षीक सभा नाहीत सर्व काही कारभार मनमानी चालला आहे. सदर संस्थेवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी उपविभागीय अभियंता, शाखा अभियंता यांच्यावर असते परंतू यांना देखील हिस्सा मिळत असल्याने संस्थेच्या बेकायदेशीर कारभारावर दुर्लक्ष करत आहेत. सदर संस्थांचा पारदर्शक चालण्यासाठी राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्षांनी अजितदादांच्या निदर्शनास कारभार आणून द्यावे. यासंदर्भात वाणेवाडीच्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी मारुती पाणी वापर संस्थेच्या कारभाराची माहिती मागवली होती सदर माहिती न दिल्याने अनिल भोसले यांनी राज्य माहिती आयोगाकडे दाद मागितली आहे.
पणदरे पाटबंधारे विभागात असणाऱ्या संस्था
वडगांव शाखा - ६
पणदरे शाखा - ६
माळेगांव - ५
मळद - १४