-->
बारामती: माळवाडीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून कलाकारांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

बारामती: माळवाडीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून कलाकारांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

कोऱ्हाळे बु- कोरोना महामारीमुळे संपूर्ण देशावर संकट आले आहे. यामध्ये वाजंत्री कलाकारांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. अशा गंभीर संकटात माळवाडी - लाटे ( ता. बारामती ) येथील जिजामाता बॅन्डचे मालक सुधाकर गेजगे यांनी ३५ कलाकारांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करुन दिलासा दिला आहे. 

             माळवाडी - लाटे येथे गेजगे यांच्या निवासस्थानी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे वाटप तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, दुध संघाचे अध्यक्ष संदीप जगताप, सोमेश्वर कारखान्याचे उपाध्यक्ष शैलेश रासकर, बाजार समितीचे संचालक अनिल खलाटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बॅन्ड पथक, जागरण गोंधळ, तमाशा फडातील कलाकार उपस्थित होते. सुधाकर गेजगे यांनी प्रतिकूल परिस्थितीत बॅन्ड व्यवसाय सुरू केला; मात्र गेल्या वर्षापासून कोरोना महामारीमुळे या कलाकारांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे सांगून संभाजी होळकर म्हणाले की, सुधाकर गेजगे यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून हे कार्य निश्चितच आधार देणारे ठरणार आहे. सध्याच्या महामारीत दानशूर व्यक्तींनी अशा उपेक्षित घटकांना मदत करण्यासाठी दातृत्व दाखविण्याची गरज असल्याचे आवाहन संदीप जगताप यांनी केले. यावेळी राजेश वाघ, संजय जाधव, अजित नवले प्रवीण काळभोर उपस्थित होते.  दरम्यान, परिसरात सुधाकर गेजगे यांनी केलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article