
राज्यात पुणे, रत्नागिरी, रायगडला मुसळधार पावसाने झोडपले; पुढील ४ दिवस मुसळधार पावसाचा अंदाज
राज्यातील विविध भागांत अवकाळी पाऊस जोरदार बरसत आहे. सायंकाळच्या सुमारास सुरू झालेल्या या अवकाळी पावसाने पुुणे, रायगड, रत्नागिरी, वाशिम जिल्ह्याला चांगलेच झोडपले. अचानक झालेल्या या अवकाळी पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली तर या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना गारवा अनुभवायला मिळत आहे.
पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज
30 मे 2021
कोकणात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता.
मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.
विदर्भातील तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह सोसोट्याचा वारा वाहण्याची शक्यता
31 मे 2021
कोकण - तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता.
विदर्भातील तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह सोसोट्याचा वारा वाहण्याची शक्यता
1 जून 2021
कोकण - तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता
विदर्भातील तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह सोसोट्याचा वारा वाहण्याची शक्यता
2 जून 2021
कोकण - तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता
विदर्भातील तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह सोसोट्याचा वारा वाहण्याची शक्यता