
बारामती: राष्ट्रवादीच्या पुणे जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे यांचे पती युवा नेते रविराज तावरे यांच्यावर गोळीबार
Monday, May 31, 2021
Edit
बारामती: माळेगावच्या जिल्हा परिषद सदस्य रोहिणी तावरे यांचे पती रविराज तावरे लाखे यांच्यावर आज संध्याकाळी गोळीबार झाला. बारामतीतील खासगी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. रविराज तावरे यांना एक गोळी लागल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यांना बारामतीतील खासगी दवाखान्यांमध्ये उपचारासाठी दाखल केला आहे. मात्र हा गोळीबार का झाला आणि कोणी केला याचा तपास पोलीस करत आहेत . बारामतीतील बारामती हॉस्पिटल मध्ये त्यांना उपचारासाठी तातडीने दाखल करण्यात आले आहे. तील संभाजीनगर भागात हा गोळीबार झाल्याचे सांगितले जात आहे. अजून या विषयी पूर्ण माहिती नाही. तसेच पोलिसांकडूनही यासंदर्भात गुप्तता पाळली जात आहे त्यामुळे बारामती शहरात खळबळ उडाली आहे.