-->
सकारात्मक;  बारामती: संपूर्ण लॉकडाऊनचा फायदा; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले, लसीकरणात देखील तालुका लवकरच १ लाखाचा टप्पा ओलांडणार

सकारात्मक; बारामती: संपूर्ण लॉकडाऊनचा फायदा; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले, लसीकरणात देखील तालुका लवकरच १ लाखाचा टप्पा ओलांडणार

कोऱ्हाळे बु- बारामती तालुक्यात प्रशासनाकडून संपूर्ण लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून त्याचा फायदा आता दिसू लागला आहे. आजपर्यंत तालुक्यात एकूण 97120 नागरिकांना कोरोना लस देण्यात आली असून लवकरच तालुका 1 लाखांचा टप्पा ओलांडणार आहे.

            रुग्ण वाढीबरोबर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. काल तालुक्यात नवीन 252 कोरोना रुग्णांची भर पडली तर 329 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता काही प्रमाणात का होईना नागरिकांना दिलासा मिळण्यास सुरुवात झाली आहे.

      कालचे शासकीय (07/05/21) एकूण rt-pcr नमुने 736,  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-120, प्रतीक्षेत 242,  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -09.                      काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr --205- त्यापैकी पॉझिटिव्ह --59-.                   कालचे एकूण एंटीजन 202. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-73.                  काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   120+59+73=252   शहर-106 ग्रामीण- 146.             एकूण रूग्णसंख्या-20199       एकूण बरे झालेले रुग्ण- 15571.       एकूण आज डिस्चार्ज--329 मृत्यू-- 457.
    बारामती तालुका व शहरामध्ये काल झालेले लसीकरण-977- व आजपर्यंत झालेले covid-19 एकूण लसीकरण-  97160

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article