
बारामती; लाटे गावातील निरा नदीच्या बंधाऱ्यावर वडगांव निंबाळकर पोलिसांचा चोख बंदोबस्त; अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना प्रवेश बंदी
Friday, May 7, 2021
Edit
बारामती : बारामती तालुक्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून प्रांतअधिकारी दादासाहेब कांबळे यांनी तालुक्यात सात दिवस जनता कर्फ्यू लागू केला आहे. त्या पार्श्वभूमीवर बारामती तालुक्यातून बाहेर जाणाऱ्या व तालुक्यात प्रवेश करणाऱ्या सर्व सीमांवर पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला आहे. बारामती तालुक्यातील लाटे गावातून फलटण तालुक्यातील खुंटे गावाला जोडणारा निरा नदीच्या बंधाऱ्यावर देखील बॅरिगेट्स लावून बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शासनाने घालून दिलेले नियमाप्रमाणे अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणालाही प्रवेश दिला जात नाही.
फलटण कडून बारामती तालुक्यात प्रवेश व बारामतीहून फलटणच्या दिशेला जाणाऱ्या सर्व वाहनांची तपासणी करून त्यांना सोडण्यात येत आहे.
यामुळे आता विनाकारण फिरणाऱ्या व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ईसमांनी चांगलाच धसका घेतला आहे. गेली काही महिन्यांपासून लॉकडाऊन लॉकडाऊन काळात बारामती ग्रामीण पोलीस सर्व रस्त्यावर आपले कर्तव्य बजावत आहेत. हा बंदोबस्त वडगांव पोलिस स्टेशनचे एपीआय सोमनाथ लांडे यांच्या नेतृत्वाखाली HG धुळीराम लंगूटे करत आहेत.